Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाण्याचे प्रवाह बदलले

जळकोट प्रतिनिधी - जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा कंपनीकडून , मरसांगवी तसेच अतनूर शिवारात सौर पॅनल बसविण्यात आले आहेत परंतु हे सौर पॅनल

सत्तेच्या ऐरणीवर निर्णायक घाव कुणाचा !
गॅस दरवाढीचे परिणाम; गावोगावी पुन्हा पेटल्या चुली
एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.

जळकोट प्रतिनिधी – जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा कंपनीकडून , मरसांगवी तसेच अतनूर शिवारात सौर पॅनल बसविण्यात आले आहेत परंतु हे सौर पॅनल शेतक-यांच्या मुळावर उठले आहेत, या प्रकल्पामुळे शिवारातील पाण्याचे प्रवाह बदलले व मर सांगवी येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार मरसांगवी येथील शेतक-यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.
जळकोट तालुका हा डोंगरी भाग असल्यामुळे या तालुक्यात माळरान जमीन अधिक आहे. यामुळे या जमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचा डोळा होता. गत 4 ते 5 वर्षापासून तालुक्यातील रावणकोळा मरसांगवी तसेच अतनूर व माळहिप्परगा, शिवाजीनगर तांडा परिसरात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा कंपनीने शेतक-यांची जमीन ताब्यात घेतली आहे. काही जमीन कायमस्वरूपी विकत घेतली आहे तर काही शेतक-यांची जमीन ही लीज वर घेतली आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा कंपनीने पॅनल उभे केलेले आहेत यातून वीज निर्मिती केली जात आहे. यातून सौर ऊर्जा कंपनीला कोट्यवधी रुपयाचा फायदा होत आहे असे असले तरी मरसांगवी परिसरातील शेतकरी मात्र या सोलार कंपनीमुळे कंगाल होत आहेत. या सोलार कंपनीमुळे पाण्याचे प्रवाह पूर्णपणे बदलले आहेत. सोलार कंपनीने शेत जमिनीवर अगोदर जे कालवे होते ते पूर्णपणे सपाट करून टाकले आहेत,त्यामुळे पाण्याचा प्रवाह एकाच बाजूने अधिक येत असल्यामुळे नुकसान होत आहे. मरसांगवी येथे गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये चक्क दगड गोटे येऊन पडले, येथील जवळपास 500 ते 600 शेतक-यांचे नुकसान झाले आहे. तिरू नदीला महापूर आला तरी एवढे नुकसान झाले नव्हते. जमिनीतील काळी माती वाहून गेली आहे. हे केवळ सोलार कंपनीमुळे घडले आहे पाण्याचे प्रवाह बदलल्यामुळे असा प्रकार घडल्याचे गावकरी सांगत आहेत. मरसांगवी येथील शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी सरपंच गोरखे व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उमाकांत इमडे यांनी केले आहे. जळकोट तालुक्यातील सोलार कंपनी आता शेतक-यांसाठी अडचण ठरू लागली आहेत. या सोलार कंपनीमुळे शेतक-यांचे रस्ते बंद होत आहेत. शेतीतील पाण्याचे प्रवाह बदलत आहेत. यामुळे प्रशासनाने या सोलार कंपनीवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झालीआहेमाळहिप्परगा येथील शेतकरी राजू सोनकांबळे यांना शेताकडे जाण्यासाठी 33 फुटाचा रस्ता असताना अगदी आठ फुटांचा रस्ता शेतक-याना दिला आहे. सोलार कंपनीने या रस्त्यावर अतिक्रमण केले असताना साडेआठ फुटाचा रस्ता करताना जर सोलार कंपनीचे नुकसान झाले तर त्याची भरपाई शेतक-यांनी करावी हा कुठला न्याय असा सवालही शेतकरी राजू सोनकांबळे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS