Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने केज तालुक्यातील येवता येथे युरिया खताची सुरळीत वाटप

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील येवता येथील येवतेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये युरिया नावाच्या खताची विक्री योग्य भावाने केली आहे.गेल्या

लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला
विश्‍वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेत सहभागी व्हा ः राजेंद्र फंड

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील येवता येथील येवतेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये युरिया नावाच्या खताची विक्री योग्य भावाने केली आहे.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी युरिया खताच्या प्रतीक्षेत होते परंतु खत उपलब्ध होत नव्हते आणि ज्या एजन्सीकडे खत उपलब्ध होते अशा डीलरने अवाच्या सव्वा दराने विक्री केली जात होती काही डीलर व कृषी सेवा केंद्र वाल्याकडे बी बियाणे व खतांचा पूर्वक साठा उपलब्ध असताना देखील शेतकरी बांधवांना बियाणे खतांचा तुटवडा असल्याचे भासवत होते व तोच साठा बीबियाण्यांची व खतांची विक्री आगाऊ दराने करत होते.  राज्याचे कृषिमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जो डीलर किंवा खत विक्रेता शेतकर्‍यांना आगाऊ दराने खतबियाणांची विक्री करणार्‍या डीलर व कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कार्यवाही करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असा आदेश काढताच डीलर व कृषी सेवा केंद्रावाल्यानी मूळ किंमती प्रमाणे खत बी बियाणे विक्री करण्यास केली सुरुवात याचा अनुभव केज तालुक्यातील येवता येथील येवतेश्वर कृषी सेवा केंद्रावर दि.31 जुलै 2023 रोजी पहावयास मिळाले आहे. येवतेश्वर कृषी सेवा केंद्रावर सर्व समावेशक व योग्य दराने शेतकर्‍यांना खत वाटप केले . यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहर्यावर समाधानी झाल्याचे दिसून येते होते.

COMMENTS