Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत मोमीनपुरा भागातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली कामाला सुरुवात

तरुणाईची ताकद डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी एकवटली

बीड प्रतिनिधी - शहरातील मोमीनपुरा भागातील कुरेशी मोहल्ला येथील अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नालीच्या कामांना डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थ

पुस्तकांचे गाव भिलार पाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर होणार पहिले मधाचे गाव
विंचूर शहर व परिसरात डोळे आल्याने अनेक रुग्ण बाधित.  
एकल समितीच्या कामाचा महिला आयोगाने केला गौरव

बीड प्रतिनिधी – शहरातील मोमीनपुरा भागातील कुरेशी मोहल्ला येथील अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नालीच्या कामांना डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात मंजूर करून आणलेल्या निधीतून विकास कामे सुरू आहेत. काही ठिकाणचे कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी सुरू आहेत. त्याच निधीतून मोमीनपुरा भागातील कुरेशी मोहल्ला येथील अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नाल्यांच्या कामांना डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. यावेळी स्थानिक भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, शहरात विविध ठिकाणी विकास कामे होत आहेत. यापुढेही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. शहरातील मूलभूत सुविधेसाठी सुरू असलेली विकासकामे महत्वाची आहेत. यामुळे ही विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेवर करण्यात यावी यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने यासर्व कामांकडे लक्ष देऊन नागरिकांसाठी दर्जेदार रस्ते आणि नालीचे कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील केल्या. कुरेशी मोहल्ला येथील रस्ते आणि नाल्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांचा सत्कार करत आभार मानले. या कामाच्या ठिकाणी युवकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. यावेळी डॉ.योगेश यांची युवकांमध्ये किती मोठी क्रेझ आहे याची प्रचिती आली. यावेळी हाजी मुफ्ती अब्दुल्ला साहाब, शाहीन बेग, नगरसेवक शुभम धुत, माजी नगरसेवक युनूस इनामदार, सऊद मोमीन, माजेद कुरेशी, कुरेशी रफिक सेठ कुरेशी, हाजी जावेद कुरेशी, आजिम भाई कुरेशी, जमील भाई कुरेशी, हाजी कलीम कुरेशी, मतीन कुरेशी, जावेद वाजेद कुरेशी, साजेद जागीरदार, शाहनवाज खान, अनिस शेख, बिलाल शेख, सद्दाम मोमीन, इब्राहीम सय्यद, काशिफ चाऊस, समीर कुरेशी, अन्वर खान, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर राऊत, शहेबाज शेख, इम्रान पठाण, हाफीज खलील कुरेशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS