Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्या- आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - पीक विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू आहे. यावेळेस केवळ 1 रूपयामध्ये पीक विमा भरता ये

आ.संदीप क्षीरसागरांचा शहरवासीयांना दिलासा !
शेतकर्‍यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये-आ.संदीप क्षीरसागर
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या

बीड प्रतिनिधी – पीक विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू आहे. यावेळेस केवळ 1 रूपयामध्ये पीक विमा भरता येणार असल्याने सर्वच शेतकरी सरसावली आहेत. परंतु वेबसाईटचे सर्व्हर डाऊन तसेच इतर तांत्रिक अडचणी असल्याने लाखो शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्याचे बाकी आहेत. त्यामुळे पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
यावर्षी सुरूवातीलाच अल्प पाऊस झाल्याने पेरण्या उशीरा झाल्या. यावर्षी पीक विमा योजनेचे स्वरूप बदलले आहे. केवळ 1 रूपयामध्ये पीकविमा यावेळी शेतकर्‍यांना भरता येणार आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच शेतकरी विमा भरत आहेत. पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पीक विमा भरण्यासाठी असलेल्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन होत आहे. यामध्ये सातत्याने विविध अडथळे निर्माण होत आहेत. पीक विमा भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत, परंतु अद्यापही लाखो शेतकर्‍यांना विमा भरता आलेला नाही. उर्वरित शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये याकरीता शासनाकडून योग्य ती कार्यवाही होऊन शेतकर्‍यांना विमा भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

COMMENTS