Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचोटीने अभ्यास केल्यास शैक्षणिक प्रगती होते-आ.प्रकाश सोळंके

माजलगाव प्रतिनिधी - येथील विद्याभूवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंदफणा पब्लिक स्कुल तसेच सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कृष्णा नीळ

हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय
महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट

माजलगाव प्रतिनिधी – येथील विद्याभूवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंदफणा पब्लिक स्कुल तसेच सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कृष्णा नीळकंठ साबळे या विद्यार्थ्याने आपल्या मेहनत आणि जिद्दीने नुकत्याच झालेल्या जेइई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये 10568 रँक मिळवत आयआयटी प्रवेशास प्राप्त झाला आहे. या विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके यांनी सचोटीने अभ्यास केल्यास शिक्षणात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन केले.
सविस्तर वृत्त असे की, माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून पश्चिम बंगाल मधील खरगपूर येथील आयआयटी पर्यंत कृष्णा याने मारलेली मजल माजलगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कृष्णा याने सांगितले की, मी केमिस्ट्री विषयात उच्च शिक्षण घेत असून भविष्यात माझ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग कसा करता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असे सांगितले. त्याच्या या यशाबद्दल कृष्णा साबळे आणि त्याच्या कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सत्कार प्रसंगी कृष्णा चे वडील नीलकंठ साबळे, डॉ. गरड, डॉ. मनसबदार उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख,प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS