बीड प्रतिनिधी - भागवत ग्रंथ म्हणजे एक दिव्य ग्रंथ आहे प्रेम भक्ती व शक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवत ग्रंथ होय. असे प्रतिपादन भागवताचार्य सचिन
बीड प्रतिनिधी – भागवत ग्रंथ म्हणजे एक दिव्य ग्रंथ आहे प्रेम भक्ती व शक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवत ग्रंथ होय. असे प्रतिपादन भागवताचार्य सचिन महाराज सपकाळ यांनी बीड येथील खडकपुरा भागामध्ये चालू असलेल्या भैरवनाथ मंदिर विश्वनाथ बाबा मठ या ठिकाणी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात प्रतिपादित केले. दिनांक 20 जुलै पासून भागवताचार्य सचिन महाराज सपकाळ यांच्या सुमधुर वाणीतून अधिक मास व श्रावण मास या पवित्र संगमाच्या अनुषंगाने संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ चालू आहे.
खूप वर्षानंतर अधिक मास व श्रावण मास हा योग आलेला आहे यानिमित्त या काळामध्ये सर्वांनी नाम जप करा हरिनाम जप करा दान धर्म करा गाईंना चारा वाटप करा. भुकेलेला अन्न द्या.जेवढे होईल तेवढं आपल्या हाताने दानधर्म करीत रहा आणि सत्कर्म करत रहा हेच सत्कर्म किंवा याच हाताने केलेला दानधर्म आपल्याला यमाच्या न्यायालयात शिक्षा होण्यापासून वाचवणार आहे. हीच साक्ष ग्राह्य धरून यम धर्माच्या न्यायालया मधून सर्वांची सुटका होईल असा संदेश महाराजांनी या चालू असलेल्या काळामध्ये दिला आहे .यमाच्या दरबारात पाप व पुण्याचाच हिशोब होतो यमाचा जवळचा असणारा म्हणजेच चित्रगुप्त आपल्या सर्व कार्याची नोंद करून ठेवतो त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचा हिशोब होतो यमाच्या तावडीतून सुटण्यासाठी आपले आयुष्य भगवत भक्ती मध्ये झोकून द्या, असे महाराजांनी सांगितले. आजच्या कथेमध्ये भागवताचार्य सचिन महाराज सपकाळ यांनी विदुर काका व सुलभादेवी श्रीकृष्ण भेटीची कथा अतिशय आनंदी व भक्तीभावाच्या वातावरणामध्ये सांगितली. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी आले तेव्हा सुलभादेवीची झालेली धांदल व सुलभादेवीला झालेला आनंद हा शब्दात न सांगण्यासारखा आहे. विदुर काका गरीब होते परंतु त्यांच्या भक्तीला भाळून भगवंत त्यांच्या घरी गेले व त्यांच्या घरच्या कन्या सेवन केल्या हा प्रसंग ऐकताना भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते. या कथेच्या दुसर्या सत्रामध्ये प्रेम, भक्ती, शक्तीचा, त्रिवेणी संगम म्हणजेच भगवंताचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म सोहळा ही कथा मोठ्या भक्तीरसात व उल्हास पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली श्रीकृष्णाच्या जन्मावेळी महाराजांना संगीत सातसंगत करणार्या महाराज मंडळींनी गायलेला पाळणा व श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा व राधे राधे हो राधे राधे या भगवंताच्या नामाचा अगदी नाचून फुगड्या खेळून व तालात ठेका धरून आनंदामध्ये श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला. खरोखरच या श्रीकृष्ण सोहळा जन्म प्रसंगी भैरवनाथ बाबा मठ येथे गोकुळच फुलून गेले आहे असा सर्व परिसर श्रीकृष्ण भक्ती ने नाहुण गेला होता. या चालू असलेल्या संगीत श्रीमद् भागवत कथेला साथ संगत करण्यासाठी हभप तबला विशारद जगन्नाथ कराळे महाराज गायनाला व आवाजाला तोड नाही असे गोड गायक माऊली महाराज घुमरे त्यांना उत्कृष्ट साथ संगत करणारे ह. भ. प. मनोज महाराज बोटे, व वसुदेव काजळे सर, ऑक्टोपॅड सुनिल घोडके महाराज यांची उत्कृष्ट साथ लाभत आहे तसेच या भागवत कथेस या सर्वांच्या मार्गदर्शक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आईसाहेब ह.भ.प. कुसुमताई सपकाळ यांची अनमोल साथ लाभत आहे जय हरी.
COMMENTS