Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा.सुनिल चव्हाण यांनी केली आष्टी तालुक्यातील पीक पाहणी

आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील बेलगाव,चिंचाळा व बीडसांगवी येथे क्षेत्रिय भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी केली.आष्टी तालुक्यात मान्सून चे आगमन

विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक
स्वरातीमध्ये थायरॉईडचे  मोठ्या मोठ्या गाठी काढून शस्त्रक्रिया यशस्वी
राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन

आष्टी प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील बेलगाव,चिंचाळा व बीडसांगवी येथे क्षेत्रिय भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी केली.आष्टी तालुक्यात मान्सून चे आगमन उशिरा झाले त्यामुळे अजूनही सर्वदूर पेरण्या होऊ शकल्या नाहीत.पेरलेल्या पिकांची अवस्था सुद्धा पावसाअभावी वाईट आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी आष्टी तालुक्याचे भूमिपुत्र मा.सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील काही गावात शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.यावेळी कीड रोग  व्यवस्थापन,चिकट सापळे यांचे महत्व,पिक प्रकल्प,माती तपासणी व गट शेती अशा विविध महत्वपुर्ण बाबींवर चर्चा करून व मार्गदर्शन केले.यावेळी बोलतांना मा.आयुक्त महोदयांनी शेतकरी वर्गांनी एकत्रित येवुन संघटित शेती करण्यास चालना मिळावी या बाबत आवाहन केले.
तसेच चिकट सापळे,निमअर्क सारखे नैसर्गिक उपचाराव्दारे किड रोग नियंत्रित करण्यावर भर दिला पाहिजे जेने करून शेतीचे नुकसाण न होता उत्पादन घेता येईल व विषारी रासायनिक औषधांपासुन सुटका मिळेल. यावेळी श्री गोरख तरटे तालुका कृषि अधिकारी.श्री.प्रशांत पोळ मंडळ कृषि अधिकारी श्री.विष्णू पवार,श्री प्रशांत धस कृषिपर्यवेक्षक तसेच श्री नितिन खरात श्री आरकस,श्रीम.धस कृषिसहाय्यक व पाणी फाऊंडेशनचे कर्मचारी श्री वारे व श्री प्रवीण काथवटे गावातील शेतकरी,शेतकरी गटाचे सदस्य,महिला शेतकरी सदस्य,गावचे सरपंच,प्रगतशील शेतकरी,प्रकल्प धारक,पत्रकार यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

COMMENTS