Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक शाखेची मोहीम ; अधिकारी जाणार मतदारांच्या दारी

नाशिक प्रतिनिधी -  जिल्ह्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जाऊन मतदा

मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध
राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन
सोमय्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर अज्ञातांनी लिहिलं ”भाग सोमय्या भाग “

नाशिक प्रतिनिधी –  जिल्ह्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जाऊन मतदार यादीतील तपशील पडताळून पाहणार आहे. यादी अद्ययावत करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने केले आहे।

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार ‘घरोघरी अधिकारी’ या मोहिमेला जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. २१) सुरुवात होणार आहे. बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरापर्यंत जाणार आहेत. पात्र असूनही ज्या मतदारांनी

अजूनही निवडणूक मतदार यादीमध्ये नावे नोंदविलेली नाहीत, त्यांची नावे नोंदवून घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. २१ जुलै ते २१ ऑगस्ट अशी महिनाभर ही मोहीम सुरू राहणार असून, मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे.

हे करून घ्या – मतदार यादीत नाव तपासा

नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी

मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करा

कुटुंबातील मृत व्यक्तीची नावे मतदार यादीतून वगळा

 नाव, पत्ता किंवा अन्य

तपशिलांत दुरुस्त्या करून घ्या 

स्थलांतर झाले असल्यास पत्ता बदलून घ्या

COMMENTS