Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदारास तीन महिने शिक्षा व पंधरा लाखाचा दंड

श्री सद्गुरू पतसंस्थेकडून घेतले होते कर्ज

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील सद्गुरू पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी कर्जदार छगन सोन्याबापू वाघ याने कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
म्हणून अक्षय कुमारने धरले कपिल शर्माचे पाय l फिल्मी मसाला l LokNews24
संत ज्ञानेश्‍वर स्कूलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील सद्गुरू पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी कर्जदार छगन सोन्याबापू वाघ याने कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस तीन महिने शिक्षा आणि पंधरा लाखाचा दंड अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, श्रीसद्गुरू पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी कर्जदार छगन सोन्याबापू वाघ याने कर्ज घेतले होते. थकित कर्जफेड करण्यासाठी त्याने पतसंस्थेस धनादेश दिला होता. सदरचा धनादेश वटला नाही व पतसंस्थेस कर्ज रक्कम मिळालीच नाही म्हणून पतसंस्थेने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात निगोशिएबल इन्स्टुमेंटं कायदा कलम 138 प्रमाणे आरोपी छगन वाघ याचे विरुद्ध केस दाखल केली होती. सदर केसची सुनावणी 13 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी. पांडे यांचे समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी व उमेश डोके यांची नोंदविण्यात आली व ती ग्राह्य धरण्यात आली. तसेच आवश्यक तो कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आला. फिर्यादीची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी छगन वाघ यास दोषी धरून त्याला न्यायाधीश एम.पी. पांडे यांनी परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 चे कलम 138 अन्वये परिभाषीत व दंडनीय गुन्हयात दोषी धरून 03 महिन्यांचा सश्रम कारावास तथा रक्कम रु. 15,00,000/- (रक्कम रूपये पंधरा लाख केवळ) द्रव्य दंडाची शिक्षा तथा त्याने द्रव्य दंडाचा भरणा न केल्यास 01 महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी असे फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 255 (2) प्रमाणे तथा परक्राम्य संलेख अधिनियमाचे कलम 143 अन्वये ठोठावण्यात आली. तसेच आरोपीकडून उपरोक्त दंडाची रक्कम रु. 15,00,000/- (रक्कम रूपये पंधरा लाख केवळ) वसूल झाल्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 357 (1) (ब) नुसार ती संपुर्ण रक्कम फिर्यादीस देण्यात यावी असा आदेश करण्यात आला. फिर्यादी श्री सद्गुरु पतसंस्थेच्या वतीने अ‍ॅड. शिवाजीराव कराळे पा. अ‍ॅड करुणा रामदास शिंदे व अ‍ॅड. सत्यजीत कराळे पा. यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS