Homeताज्या बातम्यासंपादकीय

इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार

नुकतीच सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आणि विरोधक असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत दोघांनी एकमेकांविरूद्ध

तेलगे देसमचे भवितव्य ?
राजकीय मोर्चेबांधणी
तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष

नुकतीच सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आणि विरोधक असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत दोघांनी एकमेकांविरूद्ध रणशिंग फुंकले. नवी दिल्लीमध्ये एनडीएने आपल्या घटक पक्षांची बैठक बोलवली होती. या बैठकीत विरोधकांना शह देण्याचा तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा करण्यात आली. भाजपने सध्या आपल्या घटकपक्षांचा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. तर दुसरीकडे संपुआने आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे. त्यामुळे इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. मात्र विरोधकांनी प्रभावी व्हावे लागणार आहे. आजही देशांमध्ये प्रबळ विरोधक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, लोकसभा असो वा राज्यसभेत सरकारच्या ध्येयधोरणाला विरोध करता आला पाहिजे, त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास ते देखील करायला हवे. मात्र विरोधकांची ताकद क्षीण आणि विखुरलेली आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून विरोधकांची एकी वाढतांना दिसून येत आहे. पाटणा येथील परिषदेपेक्षा बंगळुरू येथील परिषदेमध्ये तब्बल 26 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रमुखांनी या सभेत सहभाग घेतला, त्यामुळे विरोधकांची ताकद वाढतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला देखील आता माहित झाले आहे की, स्वतःच्या जोरावर सत्ता मिळवता येणार नाही, तर घटक पक्षांना सोबत घेवूनच सत्ता राखली जावू शकते. त्यामुळे तब्बल 9 वर्षांनंतर भाजपला प्रादेशिक पक्षाचे महत्व समजतांना दिसून येत आहे. 2014 चा विचार करता भाजपला चांगल्या जागा मिळाल्याने भाजपने आपलाच पक्ष इतर राज्यात स्वबळावर सत्तेत कसा येईल यादृष्टीने खेळी खेळली. कधी-कधी ऑपरेशन लोटस राबवत सत्ता उलथवून आपल्या पक्षाची सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपने अनेक राज्ये काबीज केली. मात्र आजमितीस भाजपच्या हातून एक-एक राज्य हातातून जातांना दिसून येत आहे. राजस्थान, दिल्ली, पंजाब, कर्नाटक्, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश त्याचबरोबर ईशान्येकडील अनेक राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही. त्यामुळे भाजपची सत्ता हातातून जातांना दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकसभेवर होवू शकतो, त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मित्रपक्षांना जवळ करतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातून अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यासोबतच अजित पवार  आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहिले होते, मात्र त्यापूर्वी त्यांनी दोन दिवस आधीच एनडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवारांना गळ घातली होती, मात्र त्यांची ही मागणी फेटाळून शरद पवारांनी इंडियाच्या बैठकीला जाणे पसंद केले. त्यामुळे भाजप आपल्या सहकारी पक्षांना सोबत घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसून येत आहे. त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे यांनी काँगे्रसला सत्तेची भूक नसून, आमचा पंतप्रधान पदावर दावा नसल्याचे स्पष्ट केले. यातून अनेक बाबी अधोरेखित होतात. सर्वप्रथम काँगे्रसचे विरोधकांची वज्रमूठ बांधण्यास इच्छूक आहे. लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकून आणण्यास प्राधान्य देण्याचा त्यांचा विचार यातून दिसून येतो, त्यानंतर जर इंडियाची सत्ता आली तर, मगच पंतप्रधान कोण होईल याचा दावा करता येईल. इंडियाकडून पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जी, नीतीशकुमार इच्छुक असले तरी, काँगे्रस या पदावरील दावा सोडेल अशी शक्यता कमीच आहे. मात्र काँगे्रसची आताची प्राथमिकता विरोधकांची एकजूट करणे आहे. तरच काँगे्रस भविष्यात शक्तीशाली होवू शकेल, त्याचबरोबर काँगे्रसला पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेसारखा एक कार्यक्रम देण्याची गरज आहे. तरच कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागतील, मात्र आगामी लोकसभा निवडणूकीत इंडिया विरुद् एनडीए असा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

COMMENTS