Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्कार सोहळा म्हणजे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे व्यासपीठ-डॉ.योगेश क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - नायक कर्मचारी संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात ईडी कडे तक्रार | LOKNews24
सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात सुरु : ना. शंभूराज देसाई
वडाळा बहिरोबात 31 वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

बीड प्रतिनिधी – नायक कर्मचारी संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड येथे नायक कर्मचारी संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील, नवनियुक्त कर्मचारी, आदर्श कर्मचारी, यशस्वी उद्योजक, गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.सत्कारमूर्ती मध्ये सामाजिक क्षेत्रातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. संगीताताई चव्हाण, राष्ट्रवादी व्ही.जे.एन.टी. सेल चे राज्य महासचिव बी.एम.पवार, बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय सचिव रविकांत राठोड, बंजारा क्रांती दल चे युवा प्रदेशाध्यक्ष भूषण पवार, नवनियुक्त कर्मचारी आकाश राठोड (पी.एस.आय.), आदर्श कर्मचारी इंजि.गुलाब राठोड (पाटोदा), नितीन चव्हाण, यशस्वी उद्योजक शामराव राठोड (बीड), गोरख राठोड (वडवणी), संजय पवार (वडवणी), एकनाथ चव्हाण (बीड), गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दहावी- बारावी/मेडिकल/इंजि./आय.आय.टी./सेट,नेट/ एम.पी.एस.सी. इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या लोकांचा सन्मान, सत्कार केलाच पाहिजे. असे सत्कारमूर्ती समाजाला दिशा दाखवण्याचे काम करत असतात. सत्कार सोहळा हा दिशा दाखवण्याचे व्यासपीठ आहे. बंजारा समाज हा तांड्या वस्तीवर राहून हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करतात. अशा परिस्थितीतून बाहेर पडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. बंजारा समाज हा अतिशय कष्ट करणारा समाज आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून त्यावर मात करत उच्च पदावर काम करत आहे. बंजारा समाजातील अनेक जण सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. अशा लोकांचा सन्मान करायलाच हवा. आज या लोकांचा सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो. कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ऊर्जा मिळते आणि समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले जाते. सत्कार समारंभ हा एक विशेष सोहळा आहे जो विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची कबुली देतो. हे एक व्यासपीठ आहे जे विद्यार्थ्यांचे योगदान ओळखते आणि त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहित करते. बंजारा समाजासाठी शहराच्या मध्यभागी समाज भवनसाठी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून नगर पालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून त्याठिकाणी येणार्या वर्षभरात तांत्रिक अडचणी दूर करून भव्य अशी वास्तू उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. जेणेकरून त्यांना सामाजिक कार्यक्रम त्याठिकाणी आयोजित करण्यात येतील. या गुणवंतांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायक कर्मचारी संघटना बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुंदर राठोड हे होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, कार्याध्यक्ष बिभिषण राठोड, सचिव दिनेश राठोड यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, पालकवर्ग उपस्थित होते.

COMMENTS