मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. सेल्फीच्या नादात मुंबईतील समुद्रात एक महिला वाहून गेल्याची घटना ताजी
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. सेल्फीच्या नादात मुंबईतील समुद्रात एक महिला वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी मालाड मार्वेच्या समुद्रात पोहायला गेलेली तीन मुलं बेपत्ता झाली होती. त्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. निखिल साजी कायामपूर (वय 14), अजय हरिजन (वय 14) व शुभम राजकुमार जयस्वाल ( वय 14) अशी या मुलांची नावं आहेत. हे तिघेही रविवार, 16 जुलै रोजी आपल्या आणखी दोन मित्रांसह मार्वेच्या किनार्यावर पोहायला गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं पाचही जण पाण्यात बुडाले. हे समजताच स्थानिकांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. दोघांना वाचवण्यात यशही आले. मात्र, तिघे बेपत्ता झाले होते. बीएमसी कर्मचारी, पोलिस, नौदलाने स्थानिक मासेमारांच्या मदतीने बेपत्ता झालेल्या तिघांचा कालपासून शोध सुरू केला होता. आज या तिघांचेही मृतदेह सापडले. हे मृतदेह कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळू शकणार आहे.
COMMENTS