Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

इस्त्रोचा नवा विक्रम 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार मोहीमेसाठी 615 कोटींचा खर्च

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशानंतर महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान-3 मोहीमेसाठी सज

चांद्रयान-३ चं प्रेक्षपण जुलै महिन्यात होणार ?
चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ
इस्रो आज करणार चांद्रयान-3 प्रक्षेपण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशानंतर महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान-3 मोहीमेसाठी सज्ज झाले होते. इस्त्रोने नवा इतिहास रचत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता ‘चांद्रयान-3’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लाँच व्हेईकलपासून सॅटेलाईट यशस्वीपणे वेगळे केल्याची घोषणा केली.

चांद्रयान-3 चा चंद्रावर प्रवास सुरू करण्यासाठी त्याला इच्छित कक्षेत ठेवण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. चांद्रयान-3 ने त्याच्या अचूक कक्षेत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. अंतराळ यान सुस्थितीत आहे, असे इस्रोने म्हटले आहे. प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एलव्ही3 एम-4 यान यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केल्यावर आनंद व्यक्त केला. या मोहीमेसाठी केवळ 615 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

‘चांद्रयान-3’ ला अद्ययावत बाहुबली रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-4 (एलव्ही एम-4) द्वारे झेपावले आणि इतिहासाच्या पानावर भारताने एक नवा अध्याय लिहिला. या लाँचरच्या यशाचा दर आजवर 100 टक्के आहे. तब्बल सहा मोहिमा या लाँचरने फत्ते केल्या आहेत. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर चांद्रयान-3 लँडर विक्रम 40 दिवसांच्या प्रवासानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरेल. चंद्राचे ध्रुवीय प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा बरेच वेगळे आहेत. येथे असे अनेक भाग आहेत जेथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही आणि तापमान -200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. अशा परिस्थितीत बर्फाच्या रूपात अजूनही पाणी असू शकते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. भारताच्या 2008 चांद्रयान-1 मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची उपस्थिती दर्शविली होती.

चंद्रावरील अनेक गुपीते येतील समोर- चंद्रावर अनेक देशांकडून यान पाठवत, पृथ्वीवर मानवी जीवन अस्तित्वात येवू शकते का, याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच चंद्रावरील पाणी, खनिजे, पृथ्वीची निर्मिती संशोधनासाठी असे अनेक विषय घेऊन ही प्रयोगशाळा चंद्राकडे झेपावली आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्य कुठल्या ग्रहावर, उपग्रहावर, तार्यावर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, हे मानवाला असलेले कोडे उलगडण्याच्या दिशेनेही चांद्रयान-3 ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तीन महिला शास्त्रज्ञांवर लँडिंगची जबाबदारी – जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. ऋतु करिधाल या मूळच्या लखनऊच्या असून, चांद्रयान-3 च्या निमित्ताने मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. ऋतु करिधाल यांनी आधीच्या मोहिमांमध्ये केलेली कामगिरी पाहिल्यानंतरच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

COMMENTS