Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाविकांच्या गर्दीत वानराचाही सत्संग

बीड प्रतिनिधी - गुरुपौर्णिमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे श्री चिन्मय मूर्ती संस्थान च्या वतीने  तीन जुलै 2023 पासून चातुर्मास सत्संग अधि

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली दरेगाव येथे पिकांची पाहणी
पोलिस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू

बीड प्रतिनिधी – गुरुपौर्णिमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे श्री चिन्मय मूर्ती संस्थान च्या वतीने  तीन जुलै 2023 पासून चातुर्मास सत्संग अधिक मास व मठाधिपती वामनानंद महाराज यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.या कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी होत असून विशेष म्हणजे या सत्संग सोळाव्यात एक वानर दररोज भाविक भक्तामध्ये व तसेच महाराजा समवेत उपस्थिती लावत आहे.हे वानर अगदी कोणालाही त्रास न देता त्या ठिकाणी बसून राहते व कार्यक्रमाच्या आस्वाद घेत आहे.त्याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून दररोज अनेक भक्त या ठिकाणी दर्शनास येत आहेत .बजरंग बली रुपी  वानर आलेले बघून भाविक भक्त कुतूहल व्यक्त करीत आहेत.हा चातुर्मास तीन महिने चालणार असल्याची माहिती चिन्मय मूर्ती संस्थांचे बीडचे भक्त  मनोज मुळी यांनी दिली.

COMMENTS