Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीमधील समन्वयासाठी समितीची स्थापना

तिन्ही पक्षाकडून असणार प्रत्येकी 4 सदस्यांचा समावेश

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तेमध्ये भाजप, शिवसेना अर्थात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यातच मंत्रिमंडळाच

कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे-शिंदे गट एकत्र
भूजल समृध्द ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात किरकसाल प्रथम
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तेमध्ये भाजप, शिवसेना अर्थात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये सध्या तणाव वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुतीमध्ये समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये तिन्ही पक्षांकडून चार-चार आमदारांचा समावेश असणार आहे.
युतीमध्ये आधी सर्व काही आलबेल होते. मात्र अजित पवार गटाने ऐेनवेळी एन्ट्री केल्याने शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. त्यावरुन दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. त्यामुळे या समितीला महत्व प्राप्त झाले आहे.शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकी 4 सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. एकूण 12 सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार यांचा समावेश असेल. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे समितीत चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असतील. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीत समन्वय समिती आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाली. उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार, आगामी अधिवेशन काळात पुरवण्या मागण्या संदर्भात देखील चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, त्यामुळे जे नाराज आहेत त्यांची समजूत कशाप्रकारे काढायची यावरही बैठकीत चर्चा झाली आहे.

COMMENTS