Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात भाजपच्या 152 जागा निवडून येणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

मुंबई/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकांना वर्षभराचा आणि विधानसभा निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असतांना, त्यापूर्वीच राज्यात राजकारण तापण

शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 
’आषाढी’निमित्त टोल वसुली पुढे ढकला
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकांना वर्षभराचा आणि विधानसभा निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असतांना, त्यापूर्वीच राज्यात राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणार्‍या शिवसेनेच्या शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
आम्ही राज्याच्या दृष्टीने गणिते आखली आहेत. त्यानुसार आगामी सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षावर नाराज नसल्याचेही नमूद केले. पंकजा मुंडे यांच्या लहान बहिनीची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही. पण त्या बीड लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत, असे ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. यात प्रत्येक निवडणुकीत भाजप नंबर एकवर असेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसमध्ये नाराज लोकांचा मोठा ग्रुप आहे, त्यांना धीर देण्यासाठी नाना पटोलेकडून वक्तव्य सुरू आहेत. महायुती ही 206 पेक्षा जास्त आमदार झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील त्यापैकी 80 टक्के जागांवर आमचा विजय होईल म्हणतानाच 80 टक्के म्हणजे 152 जागांवर आम्ही विजयी होऊ असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दाव्यामुळे महायुतीत 152 च्यावर जागा जर भाजपला मिळणार असतील तर शिंदे गट, आणि अजित पवार गटाला नेमक्श किती जागा मिळणार हा सवाल उपस्थित होत आहे. 2024 च्या निवडणुकीत 152 भाजप आणि शिंदे- अजित पवार मिळून 200 च्या वर जागा मिळवू असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आलेले आहेत आम्ही सर्व जण मिळूण आमचे टार्गेट पूर्ण करू, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. 106 आमदार आमचे निवडून आले आहेत तर 10 अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा मिळतील. तेव्हा भाजपच्या 152 आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. 2024 ला एनडीएमध्ये जागावाटपावरुन वाद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS