Homeताज्या बातम्यादेश

कोळसा घोटाळ्यात विजय दर्डा ठरले दोषी

मुलगा देवेंद्र दर्डा देखील दोषी न्यायालय 18 जुलैला सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली प्रतिनिधी - छत्तीसगढ कोळसा खान वाटप प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विशेष न्याया

पंतप्रधानांना इतर देशातील युद्धांमध्ये रस l LokNews24
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
बाप कि हैवान ! 14 महिन्याच्या मुलीसोबत केल भयानक कांड

नवी दिल्ली प्रतिनिधी – छत्तीसगढ कोळसा खान वाटप प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 18 जूलैला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. कलम 120इ, 420 खाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहेत. विजय दर्डा यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दर्डा आणि एका कंपनीसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्‍चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी 18 जुलै ही तारीख निश्‍चित केली आहे. न्यायालयाने आयपीसीच्या कलम 120 बी 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले. माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, तसेच माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

COMMENTS