Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या 14 पदाधिकार्‍यांची अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती

बीड जिल्हा परिषदेकडून जोरदार स्वागत

बीड प्रतिनिधी - प्रसार माध्यमातील संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी गठीत केल्या जाणार्‍या राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृत

बारावीच्या परीक्षेला सुरुवात औरंगाबाद जिल्ह्यात 60 हजार विद्यार्थी देणार परीक्षा 
लोकशाही टिकवण्यासाठी …
मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध

बीड प्रतिनिधी – प्रसार माध्यमातील संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी गठीत केल्या जाणार्‍या राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समितीवर राज्यातील प्रसारमाध्यमांशी  संबंधित पात्र व्यक्तींची निवड राज्य सरकारने केली आहे.या निवडीचे बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विविध विभागीय समित्यांवर मराठी पत्रकार परिषदेच्या नऊ पदाधिकार्‍यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम 2007 हे उक्त संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 19 सप्टेंबर 2007 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले आहेत. सदरहू नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.  त्यानुसार राज्य अधिस्वीकृती समितीवर 27 सदस्यांची व 9 विभागीय अधिस्वीकृती समित्यांवर 45 सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेच्या पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एस.एम.देशमुख (ज्येष्ठ पत्रकार, पुणे), विश्वस्त किरण नाईक (दैनिक महासत्ता), शरद पाबळे (दैनिक सकाळ, पुणे),  शिवराज काटकर (दैनिक तरुण भारत, सांगली), जान्हवी पाटील (दैनिक पुढारी, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. तर, विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या दिपक केतके (मुंबई विभाग), अनिल महाजन (औरंगाबाद विभाग), विजयकुमार जोशी (लातुर विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), विजयसिंह होलम (नाशिक विभाग), गजानन नाईक (कोल्हापूर विभाग), राजेंद्र काळे (अमरावती विभाग), अविनाश भांडेकर (नागपूर विभाग), हरिष पाटणे (पुणे विभाग) या नऊ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, राज्य अधिस्वीकृती समितीवर इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागात विनोद जगदाळे व राजेश माळकर यांची नियुक्ती करण्यात आलीय. अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्या मान्यवरांचे संभाजीनगर विभागाचे समन्वयक सुभाष चौरे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,जिल्हा कार्यअध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे,जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे,जिल्हा प्रशिद्धी प्रमुख संजय हंगे,माजी कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर,माजी जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे यांच्या सह जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष, रवी उबाळे,चंद्रकांत राजहंस , अविनाश कदम,गौतम बचुटे,संजय रणभरे,दिलीप झगडे, बागवान जुनेद ,सय्यद शाकेर, तालुका अध्यक्ष हरिष यादव,गजानन मुडेगाव कर,विनायक जाधव, मधुकर तोर ,सचिन पवार,जालिंदर नन्वरेआदींनी स्वागत केलेआहे.

COMMENTS