Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत आढळले निजामकालीन तोफ गोळे

हिंगोली ः  हिंगोली शहरात महिला रुग्णालयाचे खोदकाम सुरू असताना निजामकालीन तोफ गोळ्यांचा साठा आढळून आला आहे. हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात हा साठ

तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी
जालन्यात मराठा आंदोलन चिघळलं
सुट्या अन् सवलतीमुळे बस हाउसफुल

हिंगोली ः  हिंगोली शहरात महिला रुग्णालयाचे खोदकाम सुरू असताना निजामकालीन तोफ गोळ्यांचा साठा आढळून आला आहे. हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात हा साठा आढळला आहे.  कंत्राटदारामार्फत जेसीबीने या रुग्णालयाचे खोदकाम सुरू असताना हा साठा सापडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या संदर्भात महसूल प्रशासनाला लेखी पत्र पाठवून हे तोफगोळे ताब्यात घेण्यासाठी कळविण्यात आले आहे. दरम्यान शेकडोंच्या संख्येने सापडलेले हे तोफगोळे सन 1724 ते 1948 या काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या अहवालानंतरच या बाबत इंत्यूभूत मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये तीन प्रकारचे तोफ गोळे आढळून आले आहेत. या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी हिंगोलीकरांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये पाच किलो ते पंधरा किलो वजनांच्या तोफ गोळ्यांचा समावेश आहे.

COMMENTS