Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावे

अपघातानंतर हेल्पलाईनवर वाढले फोन कॉल

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ बसच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

समृद्धी महामार्गाच्या बोगद्याखालील रस्त्यांची उंची वाढवावी – परजणे
समृद्धी महामार्गावर 200 पेक्षा अधिक वाहनांना मनाई
समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवस राहणार बंद

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ बसच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या महामार्गावर सातत्याने प्रवास नके, तर काही काळ विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यानंतर या महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे आणि किती वेळ थांबावे यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी अनेकांचे हेल्पलाईनवर फोन वाढले आहेत.
समृद्धीवरून प्रवास करणारे प्रवासी देखील या अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेताना दिसून येत आहे. कारण या अपघातानंतर नियंत्रण कक्षात वाहनचालक आणि प्रवाशांकडून महामार्गावरील सुविधा, पेट्रोल पंप आणि विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाण कोणते असेल या विषयी माहिती विचारणारे फोन कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी एका खाजगी बसचा अपघात झाला, ज्यात बसला आग लागून 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता पुन्हा अशी घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून देखील योग्य त्या उपयोजना केल्या जात आहे. विशेष म्हणजे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी औरंगाबादच्या हर्सूल येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी येणार्‍या फोन कॉल प्रतिसाद देऊन आवश्यक ती माहिती दिली जाते. या टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर विविध कारणांसाठी दररोज सुमारे 100 ते 125 कॉल येतात. मात्र बुलढाणा येथे झालेल्या अपघातानंतर या ठिकाणी येणार्‍या फोनवरून आता माहिती विचारण्याची पद्धत बदलली आहे. यापूर्वी हर्सूल नियंत्रण कक्षात येणार्‍या फोन कॉलवर वाहनचालक एंट्री-एक्झिट पॉईंट, अपघाताची तक्रार, प्राण्याचा अपघात यासह इतर समस्यांबद्दल विचारणा करत होते. मात्र आता महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वीच वाहनचालक टोल फ्री क्रमांकावर कॉल करू लागले आहेत. ज्यात महामार्गावरील सुविधा, पेट्रोल पंप आणि विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाण कोणते असेल याची माहिती विचारली जात असल्याची माहिती समृद्धी महामार्ग विभागीय अधिकारी आशिष फरांदे यांनी दिली आहे. तर बुलडाणा येथे झालेल्या अपघातानंतर आतापर्यंत असे अंदाजे 40 ते 45 फोन कॉल आल्याचे देखील फरांदे म्हणाले.  

अपघात टाळण्यासाठी हवा ब्रेक – समृद्धी महामार्गावर लांब पल्याचा प्रवास करतांना वाहनचालकांनी ब्रेक घेतला पाहिजे असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. मात्र अनेकदा प्रवासी याबाबत जागृत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने, डोळा लागल्याने अपघात होतांना पाहायला मिळत आहे. मात्र आता स्वतः प्रवाशीच हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विश्राती घेण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी सुरक्षित ठिकाणाबद्दल माहिती विचार असल्याने याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. तर यामुळे अपघात देखील टाळता येणार आहे.

COMMENTS