Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतराष्ट्रसमिती पक्षातर्फे देवळालीत मोर्चेबांधणी 

नाशिकरोड :- प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीने वातावरण ढवळून निघाले असताना राष्ट्रसमिती पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात संघटनात्मक बांधणी वेगा

यंदा सगळे सण निर्बंधाविना होणार साजरे
केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार
ऋतुराज गडाखांच्या राजकीय भेटी वाढल्या

नाशिकरोड :- प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीने वातावरण ढवळून निघाले असताना राष्ट्रसमिती पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात संघटनात्मक बांधणी वेगात सुरु आहे. देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत भिकचंद दोंदे यांच्या कन्या, डॉ. सुवर्णा दोंदे यांच्या उपस्थितीत शंकर अण्णाजी धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागातील महिलांचा पक्षप्रवेश झाला. भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून जनसामान्य तळागाळातील महिलांना नेतृत्व करण्याची संधी भारत राष्ट्र समिती पक्षाने दिली आहे. या संधीचे आम्ही सोने करू, असे सांगत महिलांनी प्रवेश केला. देवळाली मतदारसंघ, सिद्ध पिंप्री येथील युवा कार्यकर्ते धनंजय लोखंडे यांनी त्यांच्या

समर्थकांसमवेत पक्षप्रवेश केला. कसबे सुकेणेत बाजीराव भंडारे यांनी पक्षप्रवेश केला. भारत राष्ट्र समिती पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरअण्णा धोंडगे, डॉ. सुवर्णा भिकचंद दोंदे, सोमनाथ बोराडे, संदीप खूटे, विकी देशमुख, विजय पेलमहाले आदीच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाले. अखिल भारतीय ग्रामीण बचतगट अध्यक्षा वनिता उफाडे, धनंजय लोखंडे, बाजीराव भंडारे, मीना अनिल कसबे, झुंबराबाई खंदारे, पुष्पा खंदारे, अंजली लोंढे, निलम लोंढे, दिया उफाडे, रंजना कदम, आशाबाई रामचंद्र कसबे, सुमनबाई रायते, कांताबाई सुखदेव जाधव, संगीता हिरे, रंजना किसन उबाळे, विठाबाई कसबे, रत्नमाला उघडे, रुक्मिणी जाधव व ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

COMMENTS