Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसारमाध्यमांच्या दणक्याने धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भगदाड बुजले:- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 मार्गावर मांजरसुंभा येथे ब-याच दिवसांपासून भगदाड पडलेले होते.दि.03 जुलै रोजी याची

आमदार विखेंच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न
धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशाला चक्क जिवंत जाळण्याचा प्रयत्न
’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?

बीड प्रतिनिधी – धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 मार्गावर मांजरसुंभा येथे ब-याच दिवसांपासून भगदाड पडलेले होते.दि.03 जुलै रोजी याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना केली होती.याची प्रसारमाध्यमांनी दखल घेत तातडीने भगदाड बुजविण्यात आले असून प्रसारमाध्यमांच्या दणक्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कर्मचार्‍यांना खडबडून जाग आल्यानंतर भगदाड बुजवल्याने संभाव्य अपघात टळले असुन याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बीड तालुक्यातून जाणा-या धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या मार्गावर मांजरसुंभा येथील बीडकडे जाण  जाणा-या उड्डाणपूलाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात भगदाड पडले ब-याच दिवसांपासून पडलेले होते.दि.3 जुलै रोजी डॉ.गणेश ढवळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना लेखी तक्रार करून संभाव्य अपघातांची कल्पना दिल्यानंतर व याची सर्वंच प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर दोन दिवसात भगदाड बुजविण्यात आले आहे.

COMMENTS