Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी - एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली. वर्षभरापूर्वी सुरू झालेली गळती अजूनही थांबण्याचे नाव

दहशतवाद्यांचे स्लीपर सेल
Ahmednagar : सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई | LOKNews24
पंतप्रधान मोदी, शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई प्रतिनिधी – एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली. वर्षभरापूर्वी सुरू झालेली गळती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. नीलम गोऱ्हे पक्षप्रवेशावेळी म्हणाल्या की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांगले काम करत आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1992 नंतर एनडीए आणि यूपीए अशा आघाड्या झाल्या. त्यावेळेला राज विश्वासार्हता असणारा पक्ष मराठी, हिंदुत्व, महिला धोरण आणि सामाजिक न्याय या प्रश्नावर NDA सोबत असणारा राजकीय पक्ष म्हणून मी शिवसेना पक्षात 1998 साली मी शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर तलाक पीडित महिलांना न्याय काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज वरात घटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शाहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, अशी स्पष्ट भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोट अधिकाऱ्याचे संरक्षण कायदा 1986 संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव सहन करावा लागला. त्यातून हे स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा, अशी आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो, परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता. राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मी उपसभापती असल्यामुळे त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार असल्याचेही गोऱ्हे म्हणाल्या. 

COMMENTS