Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

राजकोट : गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीत शिकणार्‍या देवांश नावाच्या 15 वर्षीय मुलाचा शाळेत हृद

स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय
गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

राजकोट : गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीत शिकणार्‍या देवांश नावाच्या 15 वर्षीय मुलाचा शाळेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा भरवली होती. त्यात हा मुलगाही गुरुंबद्दल बोलणार होता. भाषणावेळी मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला, असे समोर आले आहे.

COMMENTS