Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहरातील 23 गुंडांविरुद्ध एमपीडीएफ अंतर्गत कारवाई

पुणे: शहरात दहशत माजविणार्‍या दोन गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आद

आ देखे जरा किसमे कितना है दम – गुलाबराव पाटील | LOKNews24
कर्तृत्ववान मुलाने फेडले आई वडिलांचे पांग… सोमनाथ घोलप  PSI पदी 
नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता !

पुणे: शहरात दहशत माजविणार्‍या दोन गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, आतापर्यंत शहरातील 23 गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.
वनराज महेंद्र जाधव (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), महेश उर्फ दाद्या उर्फ रोहित कुंडलिक मोरे (वय 21, रा. वडगाव राजा गणपती मंदिरामागे, वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. मोरे याला एक वर्षांसाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जाधवची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. मोरेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे असे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. मोरेच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजूरी दिली. येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरातील गुंड जाधवविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचार्‍याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मंजुरी देऊन त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्याचे आदेश दिले.

COMMENTS