Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून उडताना दिसले ड्रोन

नवी दिल्ली : लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या घरावर पहाटे साडेपाच वाजता ड्रोन उडताना दिसले. यानंतर एसपीजीने दिल्ली पोलिसांना माहिती दि

एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
स्वामींची कृपा झाली आणि भावाला पोलिसांनी सोडले…| Shree Swami Samartha Anubhav | Swami Samarth (Video)

नवी दिल्ली : लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या घरावर पहाटे साडेपाच वाजता ड्रोन उडताना दिसले. यानंतर एसपीजीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. नो फ्लाइंग झोनमध्ये ड्रोन उडवणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
यासंदर्भात माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी एक पीसीआर कॉल आला की दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनसारखी वस्तू उडत आहे. मात्र, पोलिसांनी तपास केला असता काहीही निष्पन्न झाले नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, एअर ट्रॅफिक कंट्रोललाही काहीही सापडले नाही. पंतप्रधान निवास संकुलाचे अधिकृत नाव पंचवटी आहे. हे 4.9 हेक्टर (12 एकर) मध्ये पसरलेले आहे, ज्यात 1980 च्या दशकात लुटियन्स दिल्ली येथे बांधलेले पाच बंगले आहेत. यामध्ये पंतप्रधान कार्यालय, रेसिडेन्सी झोनचा समावेश आहे. पीएम हाऊसची सुरक्षा स्पेशल प्रोटेक्शन गार्डद्वारे केली जाते. 5 बंगले असूनही त्यांना एकत्रितपणे 7, लोककल्याण मार्ग असे म्हणतात. यात पंतप्रधान कार्यालय नाही तर अनौपचारिक बैठकांसाठी खोल्या आहेत. लोककल्याण मार्ग सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद आहे. राजीव गांधी हे 1984 मध्ये तत्कालीन 7 रेसकोर्स रोडवर राहणारे पहिले पंतप्रधान होते. पीएम आवासला पूर्वी 7 रेसकोर्स रोड असे संबोधले जात असे. सप्टेंबर 2016 मध्ये रस्त्याचे नामांतर झाल्यानंतर त्याचे नावही 7 लोककल्याण मार्ग झाले आहे.

COMMENTS