Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी करणार खंडित

मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर्षी 524 धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामध्ये 61 इमारती राहण्यास योग्य नसल

मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात
मुंबईकरांच्या मालमत्ता करात होणार वाढ?
पावसाळ्यातील पूरस्थितीच्या आव्हानासाठी सज्ज रहावे; पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर्षी 524 धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामध्ये 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्यावर्षी शहरात एकूण 514 धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली होती. यावर्षी या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षी अतिधोकादायक असलेल्या काही इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत असून, इमारत कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असल्याने या इमारती तात्काळ खाली करण्याची उद्घोषणा सोमवारी नवी मुंबई महापालिकेने केली आहे. नवी मुंबई महापालिकेने राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक अशा 61 इमारतींची यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर केल्यानंतरही नागरिकांनी इमारत खाली न केल्यामुळे आज नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयामार्फत नागरिकांना 48 तासांमध्ये इमारत खाली करण्याची सूचना देण्यात आली आहे. अन्यथा इमारतींमधील वीज, पाणी व गॅस पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 48 तासांत अतिधोकादायक इमारती खाली न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता या इमारती पालिकेकडून खाली करण्यात येतील असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. संपूर्ण नवी मुंबईत पुढील दोन-तीन दिवसांत इमारत अतिधोकादायक असतानाही नागरिकांचा त्या ठिकाणी असलेला रहिवास याबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे.

COMMENTS