Homeमहाराष्ट्रसातारा

आटपाडी येथील पाणी परिषद ऑनलाईन : वैभवकाका नायकवडी

पाणी संघर्ष चळवळ व आटपाडी पाणी परिषद यांची 26 जून 2021 रोजी आटपाडी येथे होणारी पाणी परिषद कोरोनाच्या संसर्गजन्य साथीमुळे व शासकीय आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

आजचे राशीचक्र सोमवार,२० डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
शिर्डीत राम नवमी निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयेजन 
केज शहरातील नागरिकांनी महा राजस्व अभियानाचा लाभ घ्यावा- तहसीलदार

इस्लामपूर / प्रतिनिधी : पाणी संघर्ष चळवळ व आटपाडी पाणी परिषद यांची 26 जून 2021 रोजी आटपाडी येथे होणारी पाणी परिषद कोरोनाच्या संसर्गजन्य साथीमुळे व शासकीय आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गणपतराव (आबा) देशमुख आहेत.
या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी म्हणाले, 29 वर्षापूर्वी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील 13 दुष्काळी तालुक्यातील लोकांना एकत्रित करून कृष्णेचे पाणी आटपाडीला आणणेसाठी लोकांच्या सामर्थ्यावर जी संघटीत चळवळ उभी केली. त्यामधून सन 2013 मध्ये दुष्काळी भागाला पाणी आले आहे. या चळवळीमध्ये सर्व लोकांनी राजकारण सोडून योगदान दिले. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली. यामध्ये कॉ. गणपतराव (आबा) देशमुख, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, त्याच बरोबर स्व. आर. आर. पाटील (आबा), स्व. डॉ. पतंगराव कदम, स्व. अभिनेते निळु फुले, स्व. बाबासो बागवान अशा अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी लोकशाही मार्गाने आंदोलने करून ही चळवळ यशस्वी केली.
या चळवळीचे 29 वे वर्ष आहे. भारतातील लोकांनी उभारलेल्या चळवळीतील यशस्वी चळवळ म्हणून इतिहासकारांना नोंद घ्यावी लागेल. यावर्षीच्या कोरोना संसर्गजन्य साथीमुळे.जिल्हाधिकारी सांगली यांनी पाणी परिषद घेणे परवानगी नाकारल्याने या वर्षांची पाणी परिषद ऑनलाईन पध्दतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी 26 जून 2021 रोजी पाणी परिषद घेण्यात येणार आहे. या पाणी परिषदेमध्ये 13 दुष्काळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. यासाठी मिटींग आय. डी. 89608781186 पासकोड 123 या आधारे पाणी परिषदेत सहभागी होऊन
आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. याची सर्व शेतकरी बांधवानी नोंद घ्यावी. मधल्या काळात प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी नेणेचे दृष्टीने अपुरी राहिलेली कामे पुर्ण करणेसाठी दुष्काळी जनतेने पाण्यासाठी दिर्घकाळ दिलेला अभूतपूर्व लढा आहे. त्याचा दबाव शासनावर आणून पाणी
संघर्ष चळवळीच्या संघर्षात्मक रेट्यामुळे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या टेंभू, म्हैशाळ, उरमोडी व सांगोला, शाखा प्रकल्प वेळेत पूर्ण करणेचे दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीला पाणी देण्याचा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्याची अपूरी कामे वेळेत पूर्ण करणेसाठी व त्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून ती सर्व कामे वेळेवर गतीने पुर्ण करावीत, अशी पाणी संघर्ष समितीची मागणी आहे. शेवटच्या शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जोपर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत ही पाणी संघर्ष चळवळ थांबणार नाही. या ऑनलाईन परिषदेमध्ये प्रमुख वक्ते चंद्रकांत देशमुख सांगोला, राजेंद्रअण्णा देशमुख आटपाडी, प्रा. काळुगे मंगळवेढा, डॉ. बाबुराव गुरव, प्रा. बाळासाहेब नायकवडी, अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. दादासाहेब ढेरे, प्रा. विश्‍वंभर बावर, चंद्रकांत गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांनी केले.

COMMENTS