Homeताज्या बातम्यासंपादकीय

जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 

कितना खौफ होता है सत्ता के गलियारों में, पुछो उन बंदो से, ईडी होती है जिनके घरों में!

 जहाजाला छिद्र पडले की सर्वात आधी दाणादाण होते ती उंदरांची! ही बाब  महाराष्ट्राने पाहिलेल्या दुपारच्या शपथविधी काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माण

पलटीबाज नितिशकुमार ! 
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र ! 
मुंडें’चे संस्कार पाहणारे जयंत पाटील यांचे वास्तव काय ?

 जहाजाला छिद्र पडले की सर्वात आधी दाणादाण होते ती उंदरांची! ही बाब  महाराष्ट्राने पाहिलेल्या दुपारच्या शपथविधी काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात तंतोतंत उभी राहिली होती. महाराष्ट्रात एका टर्ममध्ये तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या शिंदे सरकारवर खोके सरकार असा आरोप करणारे, आता त्याच सरकारचा भाग बनले. खरे तर जे नऊ जण काल शपथविधी घेऊन मंत्री झाले, ते आपलं व्यक्तिमत्व गमावून बसलेले निव्वळ खोके आहेत. अजित पवार छगन भुजबळ यासह जे ९ मंत्री झाले, त्यांच्याविषयी महाराष्ट्राला यापुढील काळात लाज वाटेल! कारण, स्वतःविषयी निर्णय घेणे इतपत देखील ज्यांना स्वातंत्र्य राहिलेलं नाही, एवढी मजबुरी मोदी सरकारने ज्यांच्यावर आणलेली आहे, ते नुसते डोक्याचे खोके झालेले ठोकळे,  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर साष्टांग दंडवत घालत शरण गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतून परत येताच घोटाळेबाज नेत्यांना ” सलाखों के पीछे” ची गर्जना केली होती. त्यांच्या भाषणाच्या अगदी चौथ्या दिवशीच राष्ट्रवादीचे अजित पवार आणि कंपनी अब्रू चे धिंडवडे उडालेल्या कोडग्यांसारखे सत्ताशरण झाले. मोदींचा करिश्मा काय आहे, हे भल्याभल्यांना आता कळेल! अर्थात या बाबीला मोदींचा करिष्मा म्हणण्यापेक्षाही महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची लूट करण्याची जी परंपरा इथल्या सत्ताधारी जातवर्गाने चालवली आहे, त्याचा हा अविभाज्य परिणाम आहे! सत्ताधारी जातवर्ग संख्येने कमी असूनही, स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी, दलित, आदिवासी यांच्या मतांवर सातत्याने सत्तेवर येत आहे आणि याच समाज प्रवर्गातील एखाद्या ठोकळ्याला आपल्या सोबत घेऊन ते संपूर्ण ओबीसी, दलित, आदिवासी समाजाची भलावण करित आहेत. गेल्या ७० वर्षात देशाच्या राजकारणामध्ये ज्या ज्या वेळी मागासप्रवर्ग असलेल्या ओबीसी, दलित, आदिवासी यांना राजकारणात महत्त्व येऊ लागते, त्याच वेळी सत्ताधारी जातवर्ग एकत्र येऊन आपल्या नव्या खेळी उभ्या करतो. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली उभी फूट असेल किंवा अजित पवार यांचा स्वतंत्र गट झाला असेल तरीही, या सर्व प्रकरणामध्ये एक बाब मात्र निश्चित आहे की, हे सर्व विचारांती आणि ठरवून केलेली खेळी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार सातत्याने पक्षांतर्गत आपण संघर्ष करीत असल्याची भूमिका वरवर का असेना, परंतु दाखवत होते. परंतु, त्याचा खरा अर्थ आता उमगला असून, लोकांची मानसिकता ते त्यासाठी तयार करत होते. जवळपास हा ठरवून केलेला डाव आहे, असं मात्र या संपूर्ण प्रक्रियेविषयी कोणताही सर्वसामान्य माणूस म्हटल्याशिवाय राहणार नाही! तसे पाहिले तर काका – पुतण्या मिळून एकाच वेळी दोन्हीकडच्या शिवसेना संपवण्याचाही हा डाव आहे!  एका बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्या शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र करण्याची खेळी देखील यामध्ये लपलेली आहे! येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाचे सोळा आमदार अपात्र करण्याची खेळी देखील याच प्रकरणात सामावलेली आहे. म्हणून उद्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील अजित पवार हे या अनुषंगाने डेरे दाखल झालेले आहेत. अनेक दिवसापासून त्यांची मुख्यमंत्रीपदाविषयीची चाललेली रट, ही अशा माध्यमातून पूर्ण करण्याची किंवा राजकारणातली अनैतिकता वापरून पूर्ण करण्याची त्यांनी ठरवलेली बाब आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात कधीं कधीं अनैतिक बाबी कराव्या लागतात, असं वक्तव्य केले होते. त्यांचा बोलण्याचा रोख राष्ट्रवादीतून आयात केल्या जाणाऱ्या ईडीग्रस्तांविषयी होता, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने म्हणत होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार आहे. तो स्फोट महाराष्ट्राने झालेला पाहिला. जेव्हा एखाद्या वस्तूचा स्फोट होतो तेव्हा स्फोट झालेल्या वस्तूची फक्त राख शिल्लक राहते. तद्वतच राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या राजकारणाची याबरोबरच राख झाली, हे महाराष्ट्राने ध्यानात ठेवावे!

COMMENTS