Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघाताला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार

खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्यानंतर या महामार्गाच्या सदोष कामकाजाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित

अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील
खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्यानंतर या महामार्गाच्या सदोष कामकाजाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयएमचे खासदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपघाताला जबाबदार धरले आहे. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, मी याला अपघात म्हणणार नाही, हा घात आहे आणि हा घात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी राजकीय स्वार्थासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन केले. रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचे क्लिअरन्स मिळाले आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्यानंतर कोणतरी दुसरे येऊन उद्घाटन करेल, अशी भीती वाटत होती. म्हणून त्यांनी घाई गडबडीत रस्त्याचे उद्घाटन केले. हा अपघात नसून हत्या आहे. याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, जे आता पाच लाखांची घोषणा करण्यासाठी आले आहेत. या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तेच या अपघाताला जबाबदार असल्याचा ओराप जलील यांनी केला आहे.

COMMENTS