Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात प्रकरणी वाहनचालकाला अटक

पोलिसांनी केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बुलडाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातप्रकरणी वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्या

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून कामे सुरू – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री गडकरी
सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले

बुलडाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातप्रकरणी वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. अपघात टायर फुटून झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला.
गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली. यावेळी डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे. समृध्दी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसर्‍या लेन मधून जाणं अपेक्षित असतानाही बस दुभाजकावर आदळली. याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत नागपूर  ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदविले. सोबतच वाहकांची ब्रेथ अनालयझरने तपासणी करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी केली जात असून वाहक नशेत असेल तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रॅथ अनालयझार तपासणी करणे गरजेचे असल्याचे देखील धकाते यांनी स्पष्ट केले. आरटीओच्या प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाला अटक केली. वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे.

COMMENTS