Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्टीचे प्रशिक्षण कागदोपत्री देणार्‍या संस्थेची पुन्हा निवड

सचिव सुमंत भांगेंचा असाही प्रताप ः केवळ प्रशिक्षण शुल्कासाठीच निवड

मुंबई/प्रतिनिधी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे मार्फत राज्यातील सहा महसूल विभागाच्या ठिकाणी अनुसूचित जाती

पुणे प्रादेशिक सा.बां. विभागात भ्रष्टाचाराचा हैदोस
‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?
श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे मार्फत राज्यातील सहा महसूल विभागाच्या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीकडून घेण्यात येणार्‍या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण घेण्यासाठी काही संस्थांची निवड करण्यात येते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नियमांना पायदळी तुडवून ज्या संस्थेकडे कोणत्याही पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध नसतांना, अशा संस्थांची निवड करून, पुन्हा या प्रक्रियेमध्ये मोठा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रत्यय सामाजिक न्याय विभागाने दिल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि बार्टीचे पदसिद्ध अध्यक्ष सुमंत भांगे यांच्याकडे कारभारावर संशय निर्माण होत आहे.  
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बार्टीमार्फत अनु. जाती प्रवर्गातील युवक-युवतींना युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी जून 2022 मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये स्पेक्ट्रम अकॅडमी या संस्थेला ठाणे, नाशिक व औरंगाबाद या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम देण्यात आले. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रास काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता, प्रशिक्षणाच्या नावाखाली चाललेला सावळा-गोंधळ त्यांच्या नजरेस पडला, त्याबद्दल काही इॅलेक्ट्रानिक माध्यमांनी आपल्या न्यूज चॅनेलवर यासंदर्भातील वृत्त पुराव्यानिशी प्रकाशित केले आहे. युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्राची निवड करण्यात आलेली असली तरी सदरील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणासाठी आवश्यक कोणत्याच सुविधा नसल्याचे दिसून आले. वर्गांची अवस्था देखील सुमार दर्जाची असल्याचे येत आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशिक्षण बंद असून केवळ कागदावर विद्यार्थ्यांची हजेरी लावली जात असल्याचे दिसून आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी केंद्रावर भेट दिली असता भेटीच्या पुढील तारखेची हजेरी सुध्दा लावल्याचे दिसून आले. यावरुन प्रशिक्षण न देता केवळ बार्टीमार्फत मिळणारे प्रशिक्षण शुल्क उचलणे एवढे एकच काम या प्रशिक्षण केंद्रावर सुरु असल्याचे दिसून येते. आता देखील बार्टी, पुणेमार्फत राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना एमपीएससी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सुमंत भांगे यांनी पुणे व नाशिक येथे याच स्टेक्ट्रम अकॅडमीची निवड कोणते निकष विचारात घेवून केली, असा प्रश्‍न उपस्थित होतो. यापूर्वी देखील बार्टी, पुणेमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. प्रशिक्षण देणेसाठी अकोला, अमरावती, बुलढाणा येथील बोगस प्रशिक्षण संस्थाची निवड केल्याचा घोटाळा माध्यमांनी उघडकीस आणला होता. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्या बोगस प्रशिक्षण संस्थाना दिलेले काम रद्द केले होते.  दुसर्‍या बाजूला बार्टीमार्फत प्रशिक्षणाचे अतिशय उत्तम पध्दतीने काम करणार्‍या संस्थांना मात्र पुणे व नाशिक येथे प्रशिक्षण देण्यासाठी निवड करतांना जाणीवपूर्वक अपात्र करण्यात आले आहे. तसेच बार्टीसोबत मागील 10 वर्षांपासून काम करणार्‍या अनु. जातीच्या चांगल्या काम करणार्‍या संस्थांना मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. सचिव सुमंत भांगे यांची या संदर्भातील कृती ही धुर्‍यावरील भांडणासारखी असून अनु. जाती व नवबौद्ध समाजाच्या गुणवत्तापूर्ण संस्थाना सुद्धा या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक बाद केले जात आहे, त्यामुळे भविष्यात अनु. जाती प्रशिक्षण संस्था मुक्त बार्टीचा उघड अजेंडा राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

COMMENTS