सिंदखेडराजा - सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक निळकंठेश्वर मंदिरासमोरील राजे लखुजीराव जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक बारवेत लाखो माशांचा मृत्यू झाला
सिंदखेडराजा – सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक निळकंठेश्वर मंदिरासमोरील राजे लखुजीराव जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक बारवेत लाखो माशांचा मृत्यू झाला असून लाखो माशाचा खच पडला आहे माशांच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ आहे
राजे लखुजीराव जाधव यांच्या काळात अत्यंत देखणी 100 बाय 100 फुटाची चहूबाजूंनी खाली शेवटपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या असलेली उत्कृष्ट अशी बारव असून या बारवेतील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक मासे तडफडताना दिसत आहेत हे मासे मरत असताना नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत नेमकी मासे कशाने मरण पावले याबाबत गूढ कायम आहे नगरपरिषेच्या वतीने मेलेली मासे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत या भागात या मृत माशांमुळे दुर्गंधी पसरली आहेत मासे नेमके कशाने मेले याबाबत शंका निर्माण होत आहेत नगर परिषदे च्या वतीने नगराध्यक्ष सतीश तायडे व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी या बारावेच्या पाण्याचे नमुने घेतले असून मेलेल्या माशांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले
ऐतिहासिक बारवेच्या संरक्षणासाठी पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करून सिंदखेडराजा शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तू अंडर सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन वास्तूचे संरक्षण करावे व हे कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर कडक कारवाई करावी. वनश्री जनाबापू मेहेत्रे सिंदखेडराजा
ऐतिहासिक निळकंठेश्वर मंदिरासमोरील बारवेत ज्या माशा मृत्यू झाल्या आहे त्या उचलून बाहेर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत ह्या माशांचा कशामुळे मृत्यू झाला यासाठी पाणी नमुने घेतले असून माशाचे शवविच्छेदन करून दोशींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले नगराध्यक्ष सतीश तायडे
COMMENTS