Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट नोटा वटवण्यासाठी आलेला आरोपी गजाआड

मुंबई/प्रतिनिधी : भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटा वटविण्यास आलेल्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्

अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने केला घात 
बोठेच्या संपर्कात असलेल्यांना बजावले समन्स | LokNews24
यशवंत घोडे फोफसंडीकर यांना कविरत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई/प्रतिनिधी : भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटा वटविण्यास आलेल्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या भारतीय चलनातील बनावट नोटांसह एकूण सात लाखाहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. उमेश कुमार, (वय 32 ) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्‍चिमेकडील मालवणी गेट नंबर एक परिसरात एक व्यक्ती भारतीय चलनातील बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सपोनी हसन मुलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. पोलीस निरीक्षक शेळके आणि त्यांच्या पथकाने खबर्‍याने सांगितलेल्या ठिकाणावर सापळा लावला असताना त्या ठिकाणी गुप्त बातमीदाराने वर्णन केल्या प्रमाणे एक व्यक्ती आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपास पथकाने घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती केली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या एकूण आठ नोटा आणि मोबाईल फोनअसा मालमत्ता आढळून आला. म्हणून त्याच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात कलम 489 (ब), 489(क) भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  चौकशी दरम्यान त्यांच्या घराची घरझडती घेऊन लॅपटॉप, आयपॅड, 2 पेनड्राईव्ह, 4 मोबाईल, कोरे बॉन्ड पेपर रिम, मायक्रो मेमरी कार्ड आणि कलर प्रिंटर असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

COMMENTS