मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत नव्हते. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी, त्याला पुढच्या
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत नव्हते. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी, त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळत होता. मात्र राज्य सरकारच्या शालेय विभागाने शनिवारी घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी देखील इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा होत होती. मात्र, विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत तरी त्यांना पुढच्या मार्ग वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र आता अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पुनरपरीक्षेची संधी देण्यात येणार आहे. तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर त्यांना त्याच वर्गात राहणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निर्णयासाठी राज्य शासनाला शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करावी लागली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने या संदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तर सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. पुनर्परीक्षेत देखील संबंधित विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्या वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढले जाणार नाही, असे देखील या देशात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS