Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात

लातूर प्रतिनिधी - ‘आवर्तन’चा शतकपुर्ती संगीत महोत्सव शनिवार दि. 24 व रविवार दि. 25 जून असे दोन दिवस येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंक

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
नांदेड शहरातील डॉ. आंबेडकर नगरासह अन्य भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
धुळे व दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात

लातूर प्रतिनिधी – ‘आवर्तन’चा शतकपुर्ती संगीत महोत्सव शनिवार दि. 24 व रविवार दि. 25 जून असे दोन दिवस येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय होणा-या संगीत महोत्सवामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलावंतांची हजेरी लागणार आहे. हा संगीत उत्सव स्व. पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांना समर्पित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आवर्तन’चा शतकपुर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अष्टविनायक मंदीर परिसरातील गणेश हॉलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप राठी, नियोजन समितीचे प्रमुख विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, अतुल देऊळगावकर, लातूर अर्बन बँकेचे संचालक दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘आवर्तन’चा शतकपुर्ती संगीत महोत्सवात दि. 24 जून रोजी धारवाड येथील किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पद्मश्री पंडित एम. वेंकटेशकुमार यांचे गायन व बनारस येथील प्रसिद्ध नर्तक पं. सौरव व गौरव मिश्रा यांचे कत्थक नृत्य सादर होणार आहे, तर रविवार दि. 25 जून रोजी जयपुर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन व उस्ताद शाकीर खान यांचे सतार वादन सादर होणार आहे. या सर्व कलावंतांना तबला संगत पं. मुकुंदराज देव, पं. मुकेश जाधव, प्रशांत पांडव, संवादिनी संगत अभिनय रवंदे, विशाल मिश्र तर सतार साथसंगत श्रीमती अलका गुर्जर या करणार आहेत. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका रियल हनी शॉप, ठाकरे चौक, लातूर या ठिकाणी उपलब्ध असतील. प्रवेशिकासाठी 9422795796 या क्रमांकावर संपर्क साधावा. शास्त्रीय संगीत सातत्याने ऐकता यावे व ते जनमानसात रुजावे, नवीन शास्त्रीय संगीत शिकणा-या विद्यार्थ्यांना ही संधी सहज उपलब्ध व्हावी आणि महत्त्वाचे म्हणजे, शास्त्रीय संगीताचा रसिक वर्ग वाढावा या उद्देशाने एप्रिल 2015 मध्ये या आवर्तन मासिक संगीत सभेची मुहूर्तमेढ काही शास्त्रीय संगीत उपासकांनी लातूरमध्ये रोवली व अखंडितपणे आज 99 महिने पूर्ण करून शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, केवळ शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम या मासिक संगीत सभेमध्ये आजपर्यंत आयोजित केले गेले. यामध्ये गायन, वादन आणि नृत्य या सर्व कलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विविध विषयांवरील विविध ज्येष्ठ कलावंतांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने सांगीतिक कार्यशाळांचे आयोजन, चर्चासत्रे ,कलावंतांच्या मुलाखती आयोजित केल्या जातात. यामध्ये पं. राजेंद्र मणेरीकर, पं. सत्यशील देशपांडे, पं. विजय कोपरकर यांचे सप्रयोग व्याख्यान, ध्रुपद गायक आशीष मिश्रा भोपाळ यांचे कंठ साधनेवर व धृपद गायकीवर कार्यशाळा, प्रसिद्ध नृत्यांगना सौ. मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत तसेच पं. राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत तसेच पं. कुमार गंधर्व यांच्या जीवनावरील ‘कुमार दर्शन’ हा कार्यक्रम ध्वनिफितीद्वारे व दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरणातून पं. कुमार दर्शन, विविध प्रहरामधील राग ऐकायला मिळावेत या हेतूने कार्यक्रमांचे आयोजन तसेच रसिकांना, संगीत शिकणा-या संगीत साधकांना विविध वाद्यांची ओळख व्हावी या हेतूने विविध वाद्य वाजवणा-या वादकांना संगीत सभेमध्ये आमंत्रित करुन त्या वाद्याची ओळख करुन देणे व त्यांचे वादन ऐकवणे बासरी, सतार, व्हायोलिन, स्पॅनिशवीणा, संवादिनी, तबला, पखावज, सुंद्री, संतूर इत्यादी अनेक वादक कलावंतांचे वादन आयोजित केले. अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी ओतप्रोत भरलेल्या या आवर्तन च्या शतकपूर्ती दिमाखदार व ऐतिहासिक संगीत महोत्सवासाठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा रसास्वाद घ्यावा, असे आवाहन शतकपूर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, किरण भावठाणकर, नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, प्रा. शशिकांत देशमुख व समस्त आवर्तन तसेच अष्टविनायक परिवार लातूर यांनी केले आहे. आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी लातूरमधील एक शास्त्रीय संगीतातील उद्योन्मुख कलावंताचा गौरव करण्याचा निर्णय आवर्तन प्रतिष्ठानने घेतला आहे. यंदाच्या शतकपुर्ती संगीत महोत्सवात उद्योन्मुख कलावंत तेजस धुमाळ याचा गौरव करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लातूरमध्ये खुप काही चांगले आहे. ते जपले पाहिजे, वाढवले पाहिजे, असे नमुद करुन ‘आवर्तन’चा शतकपुर्ती संगीत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले, भारतातील संस्कृती आणि संस्कार खुप मोठे आहेत. त्यात संगीताचे स्थान सर्वात वरचे आहे. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य या क्षेत्रात ‘आवर्तन’चे काम खुप मोठे आहे. या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची संधी ईश्वराने आपल्याला दिली आहे. ईश्वराची ही खुप मोठी कृपा आहे, आपण सर्वजन या शतकपुर्ती संगीत महोत्सवाचा आनंद घेऊ या.

COMMENTS