Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त

नांदेड प्रतिनिधी - बोगस बियाणे घेऊन जाणार्‍या ट्रकवर कारवाई करण्यात आली. राज्यात बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणार्‍यांव

सुट्या अन् सवलतीमुळे बस हाउसफुल
‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड
31 जोडपे आडकले विवाह बंधनात

नांदेड प्रतिनिधी – बोगस बियाणे घेऊन जाणार्‍या ट्रकवर कारवाई करण्यात आली. राज्यात बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणार्‍यांविरोधात कृषी विभागाकडून धाडसत्र राबवले जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोलंबी (ता.नायगाव) येथे बोगस सोयाबीनच्या बियाण्यांचा ट्रक 11 जून रोजी सायंकाळी तालुका कृषी विभागाने पकडला. या कारवाईत 59 लाखांचे सोयाबीन बियाणे व 40 लाखांचा ट्रक असा एकूण 99 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोलंबी (ता.नायगाव) येथे गोदावरी सीड्स अँड बायोटेक बनावट कंपनी थाटून बोगस सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करणार्‍या भामट्याचा भंडाफोड कृषी विभागाने केला. याप्रकरणी सोमवारी (12 जून) नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोलंबी (ता.नायगाव) येथे बोगस सोयाबीनचा ट्रक येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांना रविवारी सकाळी मिळाली. त्यांनी कृषी सहायक इम्रान शेख, पंढरीनाथ गुंडे व सचिन देगावकर, समूह सहायक नितीन देगावकर आदींसह कोलंबी गाठली. त्या वेळी ट्रक (एमपी 48 एच 2535) उभा दिसला. याची गुणनियंत्रकाकडून तपासणी केली असता ट्रकमधील 30 किलोंचे सोयाबीनचे 690 गोण्या बोगस निघाल्या. त्या गोण्यावर गोदावरी सीडस् अँण्ड बायोटेक, प्लाँट नं. 976, गट नं. 557 मु. पो. कोलंबी (ता. नायगाव ) असे प्रिंट केलेले दिसून आले. यावरून सोयाबीनचे बियाणे कंपनी थेट कोलंबी येथेच असल्याचे स्पष्ट झाले. कृषी विभागाने तत्काळ ट्रक ताब्यात घेतला व कंपनीला सील केले. या प्रकरणी कंपनी चालक पंडित कच्छवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, या घटनेची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली असून नायगाव येथे कृषी निविष्ठांचा पकडलेल्या ट्रक प्रकरणात कारवाई करण्याची सूचना सोमवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत यंत्रणेला दिल्या. कोलंबी येथील गोदावरी सीड्स अँड बायोटेक कंपनीचा चालक पंडित कच्छवे हा गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. अनेक शेतकर्‍यांना यापूर्वीही बोगस बियाणे दिले होते. ते शेतकरी नायगाव ठाण्यात दिसत होते.

COMMENTS