Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेपवाडी गावातून कुंभार समाजातील पहिली महिला पोलीस

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरापासून अगदी हाताच्या अंतरावर असलेल्या मौजे शेपवाडी येथील दिपाली बजरंग कोल्हापुरे हिने अतिशय कष्टातून मोठ्या पर

शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे
सुरत लोकसभा निवडणुकी विरोधात याचिका दाखल

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरापासून अगदी हाताच्या अंतरावर असलेल्या मौजे शेपवाडी येथील दिपाली बजरंग कोल्हापुरे हिने अतिशय कष्टातून मोठ्या परिश्रमाने आज मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेत यश संपादन केले आहे.
दिपालीचे आई-वडील सहा महिने शेपवाडी गावात गावमजूर म्हणून काम करतात, तर सहा महिने ते महाराष्ट्र राज्यासह इतर कोणत्याही राज्यात जाऊन ऊसतोडीचे काम करतात. घराचे छप्पर डोक्याला लागेल एवढ्या छपराच्या उंचीच्या दोन जेमतम कुडाच्या खोल्यांच विश्व असलेल्या बजरंग आणि त्यांच्या पत्नीने अतोनात काबाडकष्ट करत आपल्या मुलीचे कष्टाळू धोरण ओळखत तिला लागेल ते पुरवत तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली आणि त्याच तयारीला आशीर्वाद समजून दिपालीने आई-वडिलांची ईच्छा-आकांक्षा, त्यांचा शब्द, त्यांची मनोकामना वाया न जाऊ देत हा काबाडकष्टाचा खेळ आई-वडिलांनी असाच कुठपर्यंत खेळायचा. त्यात मी लेकीची जात…, कधीही शेवटी दुसर्‍याचं धन. मी माझ्या आई-वडिलांसाठी कधी काय आणि कसे काहीतरी करू शकणार….? या विचाराने अस्वस्थ असलेल्या दिपालीने कोरोनासारख्या महामारीच्या पर्वाला न जुमानता आपले परिश्रम आणि एकाग्रता कायम ठेवत अखेर कालच्या भरतीमध्ये यश संपादित केले आणि ती महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई पोलीस म्हणून आता लवकरच प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करणार आहे. मुलगी ही शेवटी परक्याचे धन त्याचे भान ठेवून गावातील कुंभार समाजातील ती पहिली महिला पोलीस. या नंतर ती आपल्या गावावरती केंव्हा येईल…? आली तरी ती किती दिवस असेल-नसेल याची जाण ठेवत नेहमीच गावाच्या सामाजिक-राजकीय-धार्मिक आणि शैक्षणिक कामात हिरारीने पुढाकार घेणारे शेपवाडीचे माजी सरपंच विष्णुपंत शेप यांनी यावेळीही पुढाकार घेऊन दिपालीच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले.

COMMENTS