Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समता सैनिक दल शिबीर संपन्न

मुखेड प्रतिनिधी- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुखेडच्या वतीने 30 मे रोजी तक्षशिला बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात एकदिवशीय समता सैन

सिडको  हडको  परिसरासह  ग्रामीण भागात रमजान ईद ऊत्साहात साजरी..
बारामतीमध्ये धनगर समाजाचे आंदोलन
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प

मुखेड प्रतिनिधी- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुखेडच्या वतीने 30 मे रोजी तक्षशिला बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात एकदिवशीय समता सैनिक दल शिबीर संपन झाले.
सकाळी 10 वाजता समता सैनिक दलाच्या झेंड्याचे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष वाघमारे पि.एम. यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सामुहीक बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर हे होते.  कार्यकमाच्या उदघाटन प्रसंगी  जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल बनसोड, जिल्हा संस्कार सचिव नरसिंग दरबार, जिल्हा संघटक हौसाजी वारघडे, रिपब्लिकन सेना मराठवाडा समन्वयक अनिल सिरसे, वंचीत बहुजन आघाडीचे ता. समन्वयक ऐड. संजय भारदे,प्रा.वाय.एच.कांबळे, पि.एस.कांबळे,डि.पी. वाघमारे, युवा व्याख्याता  सिद्धार्थ कांबळे बेळीकर, अतिराज कांबळे,डॉ.आकाश हसनाळकर,राजेंद्र वाघमारे (इंजि.),धोंडीबा गायकवाड, अशुतोष कांबळे, अनिल बनसोडे उपस्थित होते. प्रशिक्षक संतोष दिंडे,भिमराव पवार,विलास सोनकांबळे हे होते. या शिबीरात 5 महिला व 25 तरूण युवक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हे शिबीर दोन सत्रात झाले. सकाळी ग्राऊंड, दुपारी थेरी व मार्गदर्शन झाले.  दुपारी 1 वा. दिपक लोहबदे यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी दिपक लोहबंदे, बाबुराव सर,गुंडेराव गायकवाड,भारत सोनकांबळे, विठ्ठल सिरसाठे, सरपंच कमलाकर घोडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहूल कांबळे यानी केले. दिपक लोहबदे यांनी सर्वाचे आभार मानले .

COMMENTS