Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक हात व पाय नसलेल्या दिव्यांग आश्रुबा भोंडवेंना डॉ.प्रितमताईंनी सामाजिक न्याय द्यावा:- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - पाटोदा तालुक्यातील मौजे.पिठ्ठी येथील रहिवासी आश्रुबा नामदेव भोंडवे हे एक हात व एक पाय नसलेले दिव्यांग असुन आज दि.1 जुन गुरुवार र

मुंबईत सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन
संजीवनीच्या अनुष्का उंडेचा नवा विक्रम
चक्क पोलिस आयुक्तालया समोरूनच पोलिसांची वाहने चोरली

बीड प्रतिनिधी – पाटोदा तालुक्यातील मौजे.पिठ्ठी येथील रहिवासी आश्रुबा नामदेव भोंडवे हे एक हात व एक पाय नसलेले दिव्यांग असुन आज दि.1 जुन गुरुवार रोजी पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे मोफत दिव्यांग पुर्व तपासणी शिबिर 2023 च्या निमित्ताने आलेल्या  सामाजिक न्याय विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आयोजक खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी ’ईलेक्ट्रीक स्कुटर देऊन सामाजिक न्याय द्यावा अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
पाटोदा तालुक्यातील मौजे.पिठ्ठी येथील रहिवासी आश्रुबा नामदेव भोंडवे हे खाजगी लाईनमनचे काम करत असताना 10 वर्षांपुर्वी विद्युत खांबावर चढून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शाक लागुन खांबावरून पडून झालेल्या अपघातात त्यांना डावा हात आणि उजवा पाय कापावा लागला असुन त्यांना अपंगत्व आलेले आहे. त्यांचे घर डोंगराळ भागात असल्याने त्यांना अडचण होत असुन त्यांना ’ईलेक्ट्रीक स्कुटरदेण्यात यावी अशी विनंती प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली असून खा.प्रितमताई यांनी सकारात्मकता दर्शवत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आश्रुबा नामदेव भोंडवे यांना ’ईलेक्ट्रीक स्कुटर ’ देण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड,जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना डॉ.गणेश ढवळे यांनी 3 महिन्यापुर्वी प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असुन संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड यांना लेखी आदेश देऊन सुद्धा अद्याप सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्याय मिळाला नाही.एकंदरीतच जिल्हा प्रशासनाला दिव्यांगाच्या समस्यांचे गांभीर्य दिसून येत नाही.

COMMENTS