Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट शैक्षणिक सर्टिफिकेट प्रकरणात आणखी एकाला अटक

पुणे/प्रतिनिधी ः दहावी बोर्डाचे तसेच वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे श

बापरे ! कोरोनाचा नवीन व्हेरियंट ; ६०० रुग्ण आढळले | LOKNews24
आरक्षण आणि आत्महत्यांचे सत्र
डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मुलीची एमबीबीएसला निवड

पुणे/प्रतिनिधी ः दहावी बोर्डाचे तसेच वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणात तपास पथकाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथून जगदीश रमेश पाठक (वय 33) या एजंटला अटक केली आहे. एजंटच्या पोलीस तपासामध्ये त्याने आत्तापर्यंत एकूण 30 जणांकडून पैसे घेऊन त्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या शाखेची प्रमाणपत्रे वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी जगदीश पाठक हा रोहा रायगड परिसरात एजंट म्हणून काम बघत होता. औरंगाबाद येथील मुख्य आरोपी इम्रान सय्यद याच्या संपर्कात राहून विविध शाखांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री तो करत होता. याबाबत आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .आरोपीस न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर हे करत आहे. दुसर्‍या एका घटनेत पुणे शहरातील शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश भेगडे (वय 31, रा. सुतारवाडी, पाषाण,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. भेगडे यांच्या सिक्युरिटी एजन्सीकडून शाळा, सोसायटी, खासगी कंपन्यांंना सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले जातात. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा परिसरात सुरक्षारक्षक सुमित कुमार काम पाहत होता. मध्यरात्री सुरक्षारक्षाकाची नजर चुकवून चोरटे शाळेच्या आवारात शिरले. मुख्याध्यापिका कार्यालयाजवळ असलेल्या शाळेच्या आवारातील चंदनाचा झाडाचा बुंधा कापून चोरटे पसार झाले. चंदनचोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस कर्मचारी अतुल साळवे तपास करत आहेत.

COMMENTS