Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट

मुंबई प्रतिनिधी - महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंप

मालवाहू कंटनेर भरधाव वेगाने घुसला घरात
निधी वाटपावरून नाराजीनाट्य
साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश

मुंबई प्रतिनिधी – महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे. याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे.

COMMENTS