Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरच्या डहाणू डॅममध्ये तिघे बुडाले

पालघर ः पालघरच्या डहाणू येथील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाच तरुणाचा मृत्यू झाला

हदगाव शहरात भरबाजारातील शौचालयाचा दरवाजा गायब.
प्रकाश आंबेडकर आज लोकसभेबाबत भूमिका जाहीर करणार ?
उदगीर भाजपच माजी सभापती शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये

पालघर ः पालघरच्या डहाणू येथील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाच तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत पडवले, देवजी पडवले आणि दीपक पडवले हे तिघेजण साखरा डॅमला पोहण्यासाठी गेले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. या घटनेत अनिकेत पडवले याचा मृत्यू झाला आहे. तर, देवजी पडवले आणि दीपक पडवले यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

COMMENTS