Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

23 कोटीच्या अपहार प्रकरणी फरार कारकूनाच्या संभाजीनगरमधून आवळल्या मुस्क्या

लातूर प्रतिनिधी - शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर फरार असलेला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कारक

रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज
चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

लातूर प्रतिनिधी – शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर फरार असलेला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून मनोज फुलबोयने संभाजीनगर येथे संशयित रित्या वावरताना दिसला. त्यास डॉक्टराचे वेशांतर केलेल्या पोलिसाने अरुण नावाने हाक मारताच, त्याने डॉक्टर साहेब बोला ना! अशी साद दिली. त्यावेळी डॉक्टरांच्या वेशातील व सापळा लावून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फुलबोयनेला ताब्यात घेऊन आपण पोलीस असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपी अरुण फुलबोलणे हा हवालदिल होऊन डॉक्टरांच्या वेशातील पोलिसाकडे पाहतच राहिला होता. अरुण फुलबोयने यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता लातूर येथे आणून न्यायालयात हजर केले असता त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
जानेवारी 2023 मध्ये शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांचे कडून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यांमधील फिर्याद प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असलेला मनोज फुलबोयने याच्याकडे शासकीय बँक खात्याचा अभिलेख लिहिण्याची जबाबदारी होती. याचाच गैरफायदा घेऊन, कट रचून शासकीय बँक खात्यातून पैसे काढून सदरची रक्कम गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरुण नागनाथ फुलबोयने याच्या तन्वी अ‍ॅग्रो एजन्सी फॉर्मच्या नावाने असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्याचा डाव रचण्यात आला होता. आरोपींनी ठरविलेल्या कटाप्रमाणे कामास सुरुवात करून तनवी अग्रो एजन्सी नावाचे फॉर्म उघडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून असलेल्या मनोज फुलबोयने याने बनावट आरटीजीएस प्राधिकारपत्राच्या आधारे तनवी अग्रो फार्मच्या नावाने रक्कम वर्ग केल्या व शासनाची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपये रक्कम शासकीय बँक खात्यातून काढून अपहार करण्यात आला. त्या अपहारातील रकमेपैकी जवळपास 14 कोटी रुपये रक्कम ही तन्वी अ‍ॅग्रो फार्मच्या नावाने वर्ग करण्यात आली होती. असे निष्पन्न झाले असून फार्मचा प्रोप्रायटर अरुण नागनाथ फुलबोयने हा गुन्हा घडल्यापासून म्हणजेच मागील पाच महीण्यापासून फरार होता. तो दर दोन-तीन दिवसाला राहण्याचे ठिकाणे व संपर्क क्रमांक बदलत असल्याने पोलीस पथकांना मिळून येत नव्हता. त्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्याच्या तपास करीत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदाराच्या पथकाला नमूद आरोपीचा कसून शोध घेऊन अटक करण्यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अरुण फुलबोयने हा राहात असलेल्या व वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणांना अतिशय गोपनीय पद्धतीने भेटी देऊन त्या ठिकाणी गुप्तबातमीदार नेमण्यात आले होते. सदर बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून नमूद आरोपीला अटक करण्याची योजना तयार करण्यात येत होती. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला माहिती मिळाली की, आरोपी अरुण फुलबोयने हा संभाजीनगर व परिसरात असून संभाजीनगर जिल्हा रुग्णालय परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने दि. 24 मे 2023 रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदाराचे पथक लागलीच संभाजीनगर येथे रवाना होऊन, नमूद आरोपी अतिशय चपळ व हुशार असल्याने तो पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस पथकातील अंमलदारांनी डॉक्टरांचा वेश परिधान करून जिल्हा रुग्णालयात सापळा लावलेल्या ठिकाणी एक संशयित इसम वावरताना दिसला त्यावेळी डॉक्टराचे वेशांतर केलेल्या पोलिसाने त्या संशयित इसमास अरुण नावाने हाक मारली त्यावेळी त्याने डॉक्टर साहेब बोला ना! अशी साद दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता लातूर येथे आणून न्यायालयात हजर केले असता त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, पोलीस अमलदार युवराज गाडे, बाळासाहेब ओवांडकर, संतोष पांचाळ, अर्जुन कारलेवाड यांचा समावेश होता.

COMMENTS