Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंभर फूट रस्त्याचे भिजत घोंगडे अद्यापही कायम

किनवट प्रतिनिधी - राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास 80% काम पूर्ण झाले असल्यामुळे गोकुंद्यातील रेल्वेगेटवर उड्डाणपूल आणि किनवट, गोकुंद्यातील 30 मिटर

लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात
कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा महेश भुषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्कारांनी सन्मान
भीमा नदी पात्रात बुडून चौघांचा मृत्यू

किनवट प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास 80% काम पूर्ण झाले असल्यामुळे गोकुंद्यातील रेल्वेगेटवर उड्डाणपूल आणि किनवट, गोकुंद्यातील 30 मिटर रुंदीचा प्रश्न अधांतरीच राहाणार हे स्पष्ट दिसत आहे. न्यायालयाच्या स्थगनादेशानंतर सर्वांचेच हातपाय ढिल्ले पडले आहेत.  30 मिटर रुंदीच्या मार्गाला अभिशाप लागल्यामुळे जमेल त्या परीने कामांची गुंडाळपट्टी करण्यात आली आहे. आमदार भीमराव केराम आणि माजी आमदार प्रदीप नाईकांनी पक्षस्तरीय राजकारण बाजुला ठेऊन सामोपचाराने सर्वसमावेशक बैठक घेऊन तोडगा काढता येत असेल तर काढावा अशी विकासप्रेमींचे म्हणने आहे.
      गोकुंद्यातील रेल्वेगेटवर उड्डाणपूल ही काळाची गरज होती. गेट बंद केल्यावर वाहतुकीची कोंडी होऊन अर्धा अर्धा तास ताटकळत बसावे लागते. उड्डाण पुलालाच खो दिल्यामुळे 30 मिटर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण कदापी शक्य नसल्याच्या चर्चेला पेव फुटले आहेत. मंत्री गडकरींच्या पोकळ वल्गणा या रुंदीकरणाला मारक ठरल्या आहेत.घगग विकासप्रेमींच्या निवेदनांकडे डुंकूनही पाहिले नाही ना प्रतिसादाचे औदार्य दाखवले नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळते. अभयारण्य प्रशासनाचा ईक्को सेंसेटटीव झोनचा मुद्दा उपस्थित करुन राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील विकासाची गती थांबवली. तो एक अकारण निमित्तमात्र अभिशापच ठरला. अनेकवेळा स्थळ पहाणीचे सोपस्कार पार पडल्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकार्यांनीग निर्णय दिला. नांदेड जिल्हाधिकार्यांच्या निर्णयापुर्वीच स्थगनादेश धडकल्यामुळे पंचाईत झाली. आता त्यावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे समजते. कोणत्या मुद्यावर स्थगनादेश आहे ? त्यापेक्षा उर्वरित मुद्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे. मालमत्ता धारकांना मावेजा मिळावा ही संबंधितांची मापक अपेक्षा होती. प्रशासन आणि एजन्सीच्याच मर्जीने कामे होतील. रुंदीकरणाच्या अपेक्षा मावळल्या. राजकारण विरहीत माजी आणि आजी आमदारं एकत्रित येऊन मार्ग काढण्याची एक संधी असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

COMMENTS