Homeताज्या बातम्यासंपादकीय

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून वादंग

गेल्या महिनाभरापासून नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? यावर वादंग माजलेले असताना आज उद्घाटन समारंभ पारंपारिक पध्दतीने कर

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
राजकारणातील अपरिहार्यता
भ्रष्टाचार आणि अपयश  

गेल्या महिनाभरापासून नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? यावर वादंग माजलेले असताना आज उद्घाटन समारंभ पारंपारिक पध्दतीने करण्यात आला. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित होते. मात्र, देशातील मोठे नेते तसेच त्या सभागृहाचे पदाधिकारी असलेले नेते मात्र या उद्घाटन समारंभापासून दूरच थांबल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामधून सभागृहातील एकीची भावना घटत चालली असल्याचे दिसून येत आहे. वास्तूमधील प्रवेशादरम्यान, पूर्वंपार पध्दतीला फाटा देत उद्घाटन समारंभ घेतल्याचाही आरोप होवू लागला आहे. अधुनिक भारताची संकल्पना पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. त्याचा सध्या संसदेच्या नवीन भवनाच्या शुभारंभाच्या समारंभात जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचही आरोप ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी केला आहे. तसेच पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता व्यक्त केली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नसल्याचे ज्ञात असल्याने नेहरू यांनी अधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत्याने मांडली होती. आज जे संसदेत चालले आहे ते याच्या नेमके उलटे सुरू आहे, असे गंभीर आरोप झाले आहेत. तसेच संसदेच्या कोणत्याही कामाची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थिती किंवा त्यांच्या भाषणाने होते. उदा. आधिवेशन सुरू झाले तर त्याची सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. या कार्यक्रमात लोकसभेचे स्पीकर होते. मात्र, राज्यसभेचे स्पीकर जे उपराष्ट्रपती कार्यक्रमापासून दूरच राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम मर्यादित घटकांपुरता होता का? अशी शंका अनेकांनी व्यक्त केल्याने नवीन संसद भवनाची गरज होती का? असे सवाल उपस्थित होवू लागले आहे.
प्रारंभी या नूतन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते करण्यावरून वादंग उठले होते. त्यानंतर त्यावर नुसतीच चर्चा होत राहिली, मात्र, त्याच्यावर काहीही पर्याय निघाला नाही. सुमारे 900 ते 1200 कोटी रुपयांचा चुराडा करून उभारलेल्या देशाच्या मालमत्तेबाबत अशा उलट-सुलट चर्चा होवू लागली आहे. या प्रकारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मकता कमी होण्याची शक्यता आहे. देशाचे सर्वोच्च सभागृह उभारताना या सभागृहाचे सभासदांना तरी किमान विश्‍वासात घेऊन उद्घाटन समारंभ होणे गरजेचे होते, अशी चर्चा सुरु झाली आहे. हिंदू संस्कृतीनुसार होम-हवन करून वास्तूशांती करण्यात येते. मात्र, संविधान कर्मकांडाला विरोध करण्याची भूमिका घेण्यास पाठबळ देते, अशाच वास्तूमध्ये सुरु असलेल्या कर्मकांडामुळे आपण समारंभास उपस्थित नव्हतो ते बरे झाले, अशा प्रतिक्रिया माध्यमांवर येवू लागल्याने या उद्घाटन समारंभात नक्की काय-काय केले, हे जाणून घेण्यात देशभरातील लोकांना रस वाटू लागला आहे. कारण कोणत्याही शासकिय इमारतीमध्ये अशी कर्मकांडे करण्यास मान्यता दिली जात नाही. मात्र, देशाच्या सर्वोच्च सभागृहात असा पूजा-पाठ केल्याने अनेकांच्या भूवया उंचावला आहेत. भविष्यात संसदेचे नाराज सदस्य यावरून संसदेत आवाज उठवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

COMMENTS