अहमदनगर/प्रतिनिधी ः जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकेची तोफ ड

अहमदनगर/प्रतिनिधी ः जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकेची तोफ डागत विखेंना भाजपने इतकी पदे देवून देखील ते आमदार रोहित पवारांना मदत करत असल्याचा थेट आरोप केला होता. त्यामुळे विखे आणि शिंदेमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू असतांनाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मान्यवरांसाठी खुर्ची ठेवण्यात आल्या. मात्र आमदार असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्यासाठी खुर्ची नव्हती. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे यांना बोलावून घेत थेट आपल्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसवले. मात्र या खुर्चीच्या महानाट्याची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.
शुक्रवारी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिंदे-विखे मान-अपमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले. बैठकीवेळी स्टेजवर खुर्ची न मिळाल्याने भाजप आमदार राम शिंदे चांगलेच नाराज झाले. ते थेट स्टेजवरून निघाले. मात्र त्यानंतरफडणवीस यांनी त्यांना पुन्हा बोलावले. स्टेजवर येण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांना खुर्ची देण्यात आली. विशेष म्हणजे फडणवीसांच्या एका बाजूला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर दुसर्या बाजूला आमदार राम शिंदे यांना बसवण्यात आले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. उपमुख्यमंत्रीफडणवीस हे अहमदनगर जिल्हा दौर्यावर आहेत. त्यांच्या हस्ते नवीन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्येच हे मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी यावेळी जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांच्या मेळाव्याला देखील मार्गदर्शन केले.
विखे-शिंदेंत वाद असले तरी वादळ नाही-अहमदनगर जिल्ह्यात विखे-शिंदे वाद वाढतांना दिसून येत होता. याला कारण होते, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक. या निवडणुकीवरून शिंदेंनी विखेंवर टीका केली होती. या या वादासंबंधी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना विचारले असता ‘त्यांच्यात वाद असले तरी वादळ नाही. जे काही आहे, ते पेल्यातील वादळ आहे. तेही विरून जाईल. म्हणूनच आज दोघांनाही सोबत घेऊन बसलो आहे,’ असे उत्तर देत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बसण्यासाठी शिंदे यांना खुर्चीच ठेवण्यात आली नसल्याचे आढळून आले. ऐनवेळी त्यांच्यासाठी फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत खुर्चीची व्यवस्था करून शिंदे यांना शेजारी बसवून घेतले.
COMMENTS