Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरींना धमकीप्रकरणी एनआयएचे छापे  

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोनवरून खंडणी आणि ठार करण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक गुरुवार

Sangali : मिरज शहर सुधार समितीची जिल्हा न्यायालयाकडे मागणी (Video)
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली
केळगाव – बेळगाव बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस ; गावकर्‍यांचा वाढता पाठींबा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोनवरून खंडणी आणि ठार करण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक गुरुवारी नागपुरात दाखल झाले. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. या प्रकरणातील दहशतवादी कनेक्शन लक्षात घेता या प्रकरणाचा तपास आता एनआयए कडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातील दहशतवादी धागेदोरे शोधून काढण्यासाठी एनआयएने नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेश कांथाची सखोल विचारपूस केली.
बेळगावच्या तुरुंगात कैद असताना जयेश कांथा याने 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसर्‍यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश कांथाने  दिली होती.अकबर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) सदस्य आहे. त्यामुळे एनआय बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार असल्याचे समजते.
बेळगावच्या तुरुंगातून  नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 2  वेळा जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्‍या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणार्‍या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लश्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्यानुषंगाने एनआयए या प्रकरणाचा तपास करणार आहे.

COMMENTS