Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध खनिज कारवाईत 22 लाख रूपयांचा दंड

तहसीलदार चंद्रजीत राजपूरत अ‍ॅक्शन मोडमध्ये

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरीमध्ये नव्याने रुजू झालेले तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी राहुरीत रुजू होताच राहुरीचा महसूल व गौण खनिज विभाग क्शन मोड मध्

राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन
पबजी गेम खेळणार्‍या दोघांना रेल्वेनं चिरडलं| DAINIK LOKMNTHAN
समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे आज लोकार्पण

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरीमध्ये नव्याने रुजू झालेले तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी राहुरीत रुजू होताच राहुरीचा महसूल व गौण खनिज विभाग क्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैध वाळू व गौण खनिजा विरोधात कठोर पावले उचलत वेगवेगळ्या वाहनांवर कारवाई करून 22 लाख रुपयांचा दंड कोठावला आहे.
या कारवाईमुळे बेकायदा वाळू करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. एक एप्रिल 2023 ते 22 मे 2023 अवैध वाळू वाहतुकी बाबत आठ वाहने पकडण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकांना नऊ लाख 91 हजार 600 रुपयांचा दंड करण्यात आला. वाळू व्यतिरिक्त मुरूम, खडी, माती वाहतूक करणारे अन्य वाहनांवर कारवाई करण्यात आली . कारवाई करण्यात आलेल्या वाहनांवर 12 लाख पाच हजार चारशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवाई मध्ये एकूण 22 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई नव्याने राहुरी येथे रुजू झालेले तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार श्रीमती संध्या दळवी, नायब तहसीलदार सचिन औटी, गौण खनिज चे सुनील भवार, मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल यांचा पथकाकडून करण्यात आली. तहसीलदार राजपूत यांच्या या वाळू विरोधातील क्शन मोड मुळे अवैध वाळू व्यवसाय करणार्‍या मध्ये खळबळ उडाली आहे. यंदाच्या महसुली वर्षातील दीड महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राजपूत यांच्या कारवाईचे राहुरीतून स्वागत केले जात आहे.

COMMENTS