अहमदनगर/प्रतिनिधी ः सार्वजनीक ठिकाणी पोलिसांना व लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करीत एका तरुणाने दहशत केली. शासकीय कामामध्ये बाधा आणून धारदार शस
अहमदनगर/प्रतिनिधी ः सार्वजनीक ठिकाणी पोलिसांना व लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करीत एका तरुणाने दहशत केली. शासकीय कामामध्ये बाधा आणून धारदार शस्त्राचा वापर करून पोलिसांच्या मनात भिती निर्माण करुन शासकिय कामात अडथळा आणला. पोलिसांनी अखेर त्यास शिताफीने अटक केली .ही घटना माळीवाडा बसस्थानक येथील आउटगेटच्या समोर, हॉटेल सारंग जवळील सारंग पान स्टॉलसमोर रोजी रात्री एक वाजाण्याच्या सुमारास घडली.
या बाबतची माहिती अशी कि पोलिस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे पोलिस कॉन्स्टेबल अशोक सायकर, प्रशांत बोरुडे हे दि 23 रोजीचे एक वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक येथील आउट गेटच्या समोर पुणे बाजुस जाणारे महामार्गावर हाँटेल सारंग या ठिकाणी पेट्रोलींग करीत असता त्या ठिकाणी लोक धावपळ करताना दिसल्याने पोलिसानी पाहीले असता सारंग पान स्टॉल समोर एक तरुण त्याचे हातात धारदार सूरा घेवुन मोठमोठ्याने आरडाओरड व शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले.कोतवाली पोलिस त्या इसमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्या इसम मोठमोठ्याने ओरडून पोलिसांना एक एक को चिर दूंगा, फाड दुंगा, कोई आगे आया तो उसका काम तमाम कर दूंगा, असे म्हणून आव्हान केले. पोलिस उप निरीक्षक दुर्गे यांनी प्रसंग सावधान राखुन अधिक मदत म्हणुन गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना फोन करुन बोलावले. तसेच त्या इसमास वेळोवेळी शांत राहण्याबाबत सांगीतले असता त्याने पोलिसांचे न ऐकता पोलिसाना शिवीगाळ करीत होता, काही वेळातच गुन्हे शोध पथक त्या ठिकाणीं आले. पोलिस उप निरीक्षक दुर्गे यांनी त्या तरुणाशी बोलण्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवुन ठेवले .अन् गुन्हे शोध पथकाने त्या इसमास शिताफीने पकडले. त्याला जमीनीवर उताणे पाडुन त्याचे हातातील सुरा वेगळा करुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जैद जाकीर शेख (वय 28 वर्ष रा.जलालशहा दर्गा जवळ भारस्कर कॉलनी लाल टाकी अ.नगर) पोलिसांनी त्याच्याकडून 12 इंच लांब पाते, 10 इंच लांबीची मूठ असलेली, सु-याचे पुढील बाजुस निमुळते टोक, सु-याचे पात्याचे एका बाजुस तीक्ष्ण धार व दुसरी बाजु अंतरवक्र असलेला सूरा जप्त केला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बोरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जैद शेख याचे विरुद्ध भा द वि कलम 353, 323, 504, 506 तसेच शस्त्र अधिनीयम 1959 चे कलम 4/25 व महाराष्ट्र जिल्हा दंडाधिकारीसो यांचेकडील आदेश महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1)(3)/135 चे उल्लघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक कचरे हे करित आहेत.
COMMENTS